मोटरमनसाठी लोकलमध्ये स्वच्छतागृहाची मागणी

Local
Local

मुंबई - मोटरमनने लोकल थांबवून लघुशंका केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे चर्चा सुरू झाली. त्यामुळे मोटरमनच्या डब्यात स्वच्छतागृहाची सोय करण्याची मागणी पुन्हा पुढे आली आहे. लघुशंकेला जाणे टाळण्यासाठी लांबच्या प्रवासात मोटरमन व गार्ड पाणीच पीत नसल्याचे सांगण्यात आले.

लोकलमधील मोटरमनच्या डब्यात किंवा स्थानकात मोटरमनच्या डब्याजवळ स्वच्छतागृहाची मागणी मध्य रेल्वेच्या मोटरमननी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. बुधवारी (ता. 17) मोटरमन लोकल थांबवून लघुशंका करीत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरू लागला. त्यामुळे मोटरमनच्या डब्यात स्वच्छतागृहाची सोय करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा वा कर्जत आणि चर्चगेट ते डहाणूरोड या लोकल प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागतात. तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवासाची वेळ आणखी वाढते. प्रवासादरम्यान स्वच्छतागृहात जाण्याची निकड भासल्यास मोटरमनची कुचंबणा होते. त्यामुळे लोकलमधील मोटरमनच्या डब्यात स्वच्छतागृह असावे, अशी मागणी मोटरमननी केली आहे.

लोकलच्या डब्यात स्वच्छतागृह नसल्यामुळे पाणी पिता येत नाही. पाणी प्यायल्यास लघुशंकेसाठी जावे लागेल, याची भीती असते. अगदीच निकड भासल्यास नैसर्गिक विधीसाठी गाडीतून उतरावे लागते. भारतीय रेल्वे अधिनियम क्र. 145 नुसार उघड्यावर नैसर्गिक विधी करणे गुन्हा असल्याकडे मध्य रेल्वेच्या मोटरमननी लक्ष वेधले. या समस्येवर रेल्वेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

मागणीकडे दुर्लक्षच
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये शौचालयाची सोय असते. मात्र, लोकलमध्ये अशी सोय नसते. लोकलमध्ये स्वच्छतागृहाची सोय करण्याची मागणी निवृत्त मोटरमन टी. अप्पा दुराई 10 वर्षांपासून करीत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com