दादर स्थानकाच्या नामांतरासाठी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई, ता. 1 - दादर रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी असे नामांतर करावे, या मागणीसाठी दलित युथ पॅंथरतर्फे बुधवारी दादर पश्‍चिम येथील कविवर्य केशवसुत उड्डाण पुलाखाली आंदोलन करण्यात आले. 

संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य सचिव व प्रवक्ता नीलेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. येत्या 6 डिसेंबरपर्यंत हे नामांतर झाले नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणारा लाखोंचा जनसमुदाय दादर आणि मुंबई सोडणार नाही. दादर रेल्वे स्थानकातून एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. 

Web Title: Movement for the name of Dadar station