अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामगार मंडळाच्या विविध मागण्यांकरीता धरणे आंदोलन

mumbai.
mumbai.

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या विविध मागण्याकरीता मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले. 

कामगार कल्याण निधी दरवाढ कामगारांना रु २० व मालकांना रु.६० एवढी मान्य झाली असूनही त्याची अंबलबजावणी प्रलंबित आहे ती त्वरीत लागू करणे. शासनाकडून येणारी त्रिपक्षीय अंशदान थकबाकीची रक्कम गेल्या कित्येक वर्षापासुन ८० कोटीच्या घरात पोहचली आहे,ती त्वरीत उपलब्ध करुन देणे, डी.पी.सी. अंतर्गत कर्मचा-यांना पदोन्नती देणे, १० वर्षे सेवा झालेल्या अर्धवेळ कर्मचायांना ८ तासाचे किमान वेतन लागू करणे,अर्धवेळ कर्मचा-यांना दर सहा महिन्यांनी वाढणारा विशेष महागाई भत्ता लागू होणे, वेतनात वाढ होणे व ५ टक्के घरभाडे भत्ता लागू करणे, शासन निर्णयानुसार ड वर्ग कर्मचा-यांना क वर्गात पदोन्नती देऊन समाविष्ट करुन घेणे, मंडळाच्या कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणेच दि.१ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करणे, मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्र सरकारच्या इमारती जिर्ण झाल्या असून त्या त्वरीत दुरुस्त करणे, अपेक्षीत प्रतिसाद नसल्याच्या कारणास्तव कामगार कल्याण केंद्रे बंद करण्याचा घाट घातला जात आहे ते न करणे, मंडळाच्या इमारतीतील समागृह आरक्षण शुल्कात झालेली भाढेवाढ कमी करणे, पुरेशा स्वच्छता कर्मचारी नसल्याने इमारतीचा स्वच्छतेचा ठेका देणे आदी विविध मागण्यांकरीता हे आंदालन करण्यात आले. 

धरणे आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून मंडळाच्या आस्थापनेवरील कर्मचारी प्रचंड उत्साहात सहभागी झाले  होते. शांततेने पार पडलेल्या या धरणे आंदोलनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, कामगार मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, कामगार राज्यमंत्री विजय देशमुख, संबंधीत खात्यांचे सचिव आदीना प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन मागण्या मान्य करण्यासंबंधी विनंती करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या नेतृवाखाली संघटनेचे मानद सदस्य दिलीपदादा जगताप, सरचिटणीस अनंत जगताप महाराष्ट्रातील सर्व विभागीय संघटक, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारीणी सदस्य, व संघटनेचे महाराष्ट्रातील मंडळाच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून धरणे आंदोलन यशस्वी झाल्याचे संघटनेचे सरिचटणीस अनंत जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com