चित्रपट, नाटकची नामांकने जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

मुंबई - नाटक, मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर झाली आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा झाला. 

चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नशीबवान’, ‘रेडू’, ‘पळशिची पिटी’, ‘मांजा’ आणि ‘कॉपी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली. नाटक विभागातील नामांकन यादीत ‘वेलकम जिंदगी’, ‘माकड’, ‘संगीत देवबाभळी’, ‘अनन्या’ व ‘अशी ही श्‍यामची आई’ या नाटकांचा समावेश आहे. मालिका विभागातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कार नामांकनात ‘कुलस्वामिनी’, ‘सरस्वती’, ‘नकळत सारे घडले’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘लेक माझी लाडकी’ अशा एकूण पाच मालिकांमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. यंदाचा १८ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा रविवारी (ता. ६) सायंकाळी ६.३० वाजता जोगेश्‍वरी येथील कमालीस्थान स्टुडिओ (कमल अमरोही) जेव्हीएलआर येथे रंगणार आहे.

Web Title: Movies Drama nominations released