सत्तेतून बाहेर पडण्याचा खासदार अडसूळांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

मुंबई - रद्द झालेल्या नोटा सहकारी आणि जिल्हा बॅंकांत न स्वीकारण्याच्या निर्णयाला स्थगिती न मिळाल्यास आम्हाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची याबाबत खासदारांशी चर्चा झाली, त्या वेळी त्यांनीही हीच भूमिका मांडली. याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुखच घेतील, असा इशारा शनिवारी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि को. ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंद अडसूळ यांनी दिला.

सहकारी बॅंकांना नव्या नोटा दिल्या जात नाहीत. त्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. सहकारी बॅंकांना सुविधा पुरवण्यात रिझर्व्ह बॅंक दुजाभाव करीत आहे. सहकारी बॅंका बंद पाडण्याचा हा डाव आहे. याबाबत रविवारी (ता. 20) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची आम्ही भेट घेणार आहोत. त्यानंतरही प्रश्‍न न सुटल्यास रिझर्व्ह बॅंकेवर मोर्चा काढू, असा इशारा अडसूळ यांनी दिला. नोटाबंदीबाबत 10 दिवसांपासून शिवसेना आक्षेप नोंदवत आहे. अशा वेळी लोकसभेतील खासदार म्हणून आपल्याला काय वाटते, शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता अडसूळ म्हणाले, की सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर आरडाओरडा करू. वेळ पडल्यास आम्हाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल.

सहकारी बॅंकांत पैसा पडून
सहकारी बॅंकांत आलेल्या जुना नोटा राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंका स्वीकारत नाहीत. हा पैसा सहकारी बॅंकांत पडून आहे. पैसे ठेवायला जागा नाही. मॅनेजरच्या केबिनमध्ये पैसे पडून आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास कष्टकऱ्यांच्या सहकारी बॅंकांचे कामकाज ठप्प होईल, अशी भीती अडसूळ यांनी व्यक्त केली.

Web Title: MP adasul warning to party