खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण; मुंबईतील रुग्णालयात दाखल

तुषार सोनवणे
Tuesday, 27 October 2020

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - राज्य सरकाच्या मंत्री मंडळातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुनिल तटकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. 

एकतर्फी प्रेमातून अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातच आता कोकणातील राष्ट्रवादीचे मोठे नेते खासदार सुनिल तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत हाय अलर्ट, ड्रोन उडवण्यास पोलिसांची बंदी 

तटकरे यांनी ट्विट करून यासंबधीची माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यकर्ते आणि जनतेच्या आर्शिवादाने लवकरच बरे होऊन आपण जनसेवेत रुजू होऊ असे त्यांनी म्हटले आहे.

------------------------------------------ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sunil Tatkare infected with corona Hospitalized in Mumbai