Vidhan Sabha 2019 : सुप्रिया सुळे म्हणतात, हिच होऊ शकते महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री

SULE.jpg
SULE.jpg

मुंबई : बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत एक माेठा खुलासा केला आहे. त्यांनी पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहण्यास आवडेल या प्रश्नाचे उत्तर देताना, त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव घेतले. 

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुलाखतीत सध्याच्या निवडणुकीवर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या राजकीय वारसदारापासून ते अजित पवारांविषयी त्यांनी अनेक खुलासे केले. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी शरद पवारांच्या राजकीय वारसदाराबरोबरच अजित पवारांविषयी त्यांनी मत मांडलं. सुळे म्हणाल्या, “शरद पवारांचा राजकीय वारसदार येणारा काळ ठरवेल. तो वारसदार पक्ष आणि कार्यकर्ते ठरवतील. कुठलाही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार शरद पवार ठरले. वारसदार होणे हे काही शेअर्स नाहीत. तो वारसा कुणालाही मिळू शकतो,”

यावेळी त्यांना महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल हा प्रश्न विचारला यावर त्या म्हणाल्या, प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदे वकिल आहे. खूप कष्ट घेते. तसेच स्थानिक पातळीवर तिचं खूप चांगलं काम आहे, असं सांगतानाच “राज्याच्या राजकारणात येण्याचा विचार नाही. मी संसदेत काम करते. देशात मी प्रत्येक सत्राला पहिली येते. तो लोकांचा विश्वास आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 

दरम्यान, अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी त्या म्हणाल्या, अजित पवार नेहमी खरं बोलतात. बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा तो त्यांचा अनुभव आहे. त्यांना त्या मीटिंगमध्ये अनुभव आला. तो त्यांनी सांगितलं,” असं त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com