मधु मंगेश कर्णिक यांना ‘मृदगंध’ जीवनगौरव पुरस्कार

File Photo
File Photo

मुंबई : लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्योती म्हापसेकर, अभिनय क्षेत्रासाठी अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, प्रसिद्ध लोककलावंत वसंत अवसरीकर, संगीतकार अच्युत ठाकूर यांनाही ‘मृदगंध’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

या पुरस्कराचे यंदाचे हे नववे वर्ष असून या वर्षीच्या पुरस्काराची घोषणा विठ्‌ठल उमप यांचे चिरंजीव गायक नंदेश उमप यांनी केली. ९ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व मृदगंध पुरस्काराचे आयोजन २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात येणार आहे. 

याप्रसंगी नेत्र चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने, दिग्दर्शक राजदत्त आणि ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारोहाच्या निमित्ताने संगीत  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com