ठाणे शहरातील थकबाकीदारांविरोधात महावितरणचा बडगा 

 ठाणे शहरातील थकबाकीदारांविरोधात महावितरणचा बडगा 

ठाणे -  कळवा ते मुंब्रा परिसरात खासगी टोरंटो कंपनीच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा विषय वादग्रस्त ठरल्याने तो सध्या बाजूला सारण्यात आला आहे. पण, त्याच वेळी या परिसरात थकबाकी वाढल्याने महावितरणने थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करून त्यांच्या वीजजोडण्या तोडण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहरातील 1 लाख 15 हजार 580 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमचा खंडित करण्यात आला असून, त्यांनी महावितरणची 44 कोटी 31 लाख रुपयांची देणी थकवल्याची माहिती समोर आली आहे. 

काही महिन्यांपासून कळवा, मुंब्य्राच्या वीज खासगीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. टोरंटो कंपनीला कळवा, मुंब्य्रात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दिला आहे. दुसरीकडे महावितरण मात्र टोरंटोसाठी आग्रही आहे. येथील विजेची मागणी, थकबाकी आणि उत्पन्नाचे गणित जुळत नसल्यानेच खासगीकरणाची कुऱ्हाड या भागावर उगारण्यात आली आहे. परंतु, आता त्यात काही अंशी तथ्य असल्याचेही महावितरणच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

महावितरणने थकबाकीदारांची, तसेच कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे डिव्हिजन 2 मध्ये येणाऱ्या कळवा, पॉवर हाऊस आणि विकास आदी भागांचा सहभाग आहे. येथील 18 हजार 368 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमचा खंडित करण्यात आला आहे. येथील वीज ग्राहकांनी महावितरणची 26.37 कोटींची देणी थकवली होती, तर ठाणे डिव्हिजन 3मध्ये मुंब्रा-शिळ भागातील 77 हजार 05 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर या ठिकाणी तब्बल 389.446 कोटींची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. वागळे इस्टेट सब डिव्हिजन भागातील कोलशेत, लोकमान्य आणि वागळे इस्टेट येथील 12 हजार 895 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे 18 कोटी 805 कोटींची थकबाकी होती, तर ठाणे डिव्हिजन 1 मध्ये येणाऱ्या गडकरी, किसननगर आणि कोपरी भागातील 2267 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांनी महावितरणची 8 कोटी 8 लाख 22 हजारांची थकबाकी ठेवली होती. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com