उल्हासनगर : अपघातग्रस्त तरुणाच्या कुटुंबियांना एमएसईबीची मदत

उल्हासनगर : अपघातग्रस्त तरुणाच्या कुटुंबियांना एमएसईबीची मदत

उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी  गुरुनानक शाळेच्या भिंतीवरील बॅनर काढताना एमएसईबीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका लागून मृत्यूमुखी पडलेल्या प्रमोद पंडित या तरुणाच्या कुटुंबियांना आज एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी 4 लाख रूपयांचा धनादेश दिला आहे. आमदार डॉ. बालाजी किणिकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आधार प्रतिष्ठानचे संदीप डोंगरे हे प्रमोदच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते.

प्रमोद हा कुटुंबामधला एकुलता एक कमावता होता. तो कामाला जात होता. मात्र, 15 डिसेंबर 2018 रोजी त्याची लोकल हुकल्याने तो घरी आला. ज्या गुरुनानक शाळेत त्याने शिक्षण घेतले, त्या शाळेवरील बॅनर काढण्याचे काम त्याला मिळाले. बॅनर काढत असताना उच्च दाबाच्या वाहिनीचा शॉक लागून प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. प्रमोदचा मृत्यू झाल्याने पंडित कुटुंबियांच्या घरातील आधार गेला.

प्रमोदच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना महावितरणच्या माध्यमातून आर्थिक भरपाई मिळावी, याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ.बालाजी किणीकर,आधार प्रतिष्ठानचे संदीप डोंगरे यांनी पंडित कुटुंबीयासह उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन लेखी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना बावनकुळे यांनी कल्याण विभागाचे अधिक्षक अभियंता पेटकर यांना कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले होते. त्यानंतरही डॉ. बालाजी किणिकर हे सातत्याने पाठपुरावा करत होते.

अखेर आज शिवसेनेच्या परिश्रमांना शुक्रवारी यश मिळाले. आमदार डॉ. बालाजी किणिकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,आधार प्रतिष्ठानचे संदीप डोंगरे,विभागप्रमुख राजू माने यांच्या उपस्थितीत एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी 4 लाख रूपयांचा धनादेश पंडित कुटुंबियांना दिला. प्रमोदच्या कुटुंबीयांनी डॉ. बालाजी किणिकर, राजेंद्र चौधरी, संदीप डोंगरे यांच्यासोबत अशोक सावंत यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com