एसटी महामंडळाकडून सोशल मीडियाचा केवळ गवगवा; संकेतस्थळावर ट्विटरलिंक नाही...

प्रशांत कांबळे  | Wednesday, 29 July 2020

महामंडळाचे सोशल मीडिया अकाऊंट्स सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर अधिकृत ट्विटर अकाऊंट्स सुरू करण्यात आले होते. मात्र, यापूर्वी सुरू करण्यात आलेले फेसबुक पेज संकेतस्थळावर लिंक असतांनाही त्याचा वापरच होत नसल्याचा दिसून येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी)च्या अधिकृत संकेतस्थळावर नव्याने सुरू केलेल्या ट्विटर अकाऊंट्स अद्यापही लिंक केले नाही. तर संकेतस्थळावर असलेल्या फेसबुकच्या लिंकवरून फेसबुक पेज उघडल्यास ऑक्टोबर 2015 मध्ये शेवटची पोस्ट करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून सोशल मीडियाचा वापर सुरू करण्याचा फक्त गवगवा असल्याचे दिसून येत आहे.

वातावरण बदलासोबतच मुंबईकरांची चिंता वाढली; सर्दी, तापाचे रुग्णांच्या संख्येत वाढ....

एसटी महामंडळाचे ट्विटर आणि इन्स्टाग्रामचे बनावट अकाऊंट्स नुकतेच व्हायरल झाले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने हे अकाउंट्स अधिकृत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तर त्यानंतर परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एसटी महामंडळाचे सोशल मीडिया अकाऊंट्स सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर अधिकृत ट्विटर अकाऊंट्स सुरू करण्यात आले होते. मात्र, यापूर्वी सुरू करण्यात आलेले फेसबुक पेज संकेतस्थळावर लिंक असतांनाही त्याचा वापरच होत नसल्याचा दिसून येत आहे.

श्रावण महिन्यात बटाटा महागला; लसणाचे भावही चढेच, कांदा मात्र स्थिर....

त्याशिवाय नव्याने तयार केलेले ट्विटर अकाऊंट महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला जोडणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही ट्विटर अकाऊंट्सला संकेतस्थळाला जोडले नसल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाने फक्त ट्विटरचे अकाऊंट नव्याने सुरू केल्याच्या पोस्ट राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटर आणि त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या, मात्र, एसटीच्या इतर सोशल मीडियाच्या अकाऊंट्सचे तीनतेरा वाजले असल्याचे दिसून येत आहे. 

सोसायटीत चक्कर मारताना कशाला हवा मास्क ? आधी ही बातमी वाचा, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका...

एसटी प्रवासी अनभिज्ञ
आधीच एसटीच्या प्रवाशांमध्ये मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत रेल्वेच्या धर्तीवर एसटी महामंडळानेही सामान्य प्रवाशांच्या सूचना आणि तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडवून एसटीचे प्रवासी वाढवणे आवश्यक आहे. मात्र, एसटी महामंडळातील माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या नाकर्तेपणामुळे सामान्य एसटी प्रवासी अद्याप एसटीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

झोपडपट्टीमधील 57 टक्के नागरिकांना कोविडची बाधा, मात्र औषधाविना केली आजारावर मात

एसटी महामंडळाच्या ही बाब आपण लक्षात आणून दिली. त्यामुळे तात्काळ यामध्ये बदल करण्यात आला आहे. ट्विटर लिंक करून फेसबुक पेजची लिंक त्यावरून काढण्यात आली आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

----
संपादन : ऋषिराज तायडे