वाकायामा प्रांतासोबत एमटीडीसीचा करार - जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने जपानमधील वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

राज्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज जपानमध्ये वाकायामा प्रांताचे राज्यपाल योशीनोबू निसीका यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

जपानच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या शिष्टमंडळात रावल यांच्यासह "एमटीडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक के. एच. गोविंदराज, सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी, महाव्यवस्थापक स्वाती काळे, प्रकल्प प्रमुख आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैसवाल यांचा समावेश आहे.

रावल म्हणाले, की जपानमधील वाकायामा प्रांतासमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य करारातून या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय निर्माण झाला असून, यापुढील काळात त्याला चालना देण्याच्या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य 2017 हे वर्ष "व्हिजिट महाराष्ट्र इअर' म्हणून साजरे करीत आहे. महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतात दोन्ही राज्यांतील पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

या वेळी मंत्री रावल यांनी निसीका यांना महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

निसीका म्हणाले, की महाराष्ट्र राज्य हे वाकायामा प्रांतासाठी भारत देशाचे प्रवेशद्वार आहे. सामंजस्य करारातून दोन्ही राज्यांच्या पर्यटन विकासाला चालना मिळत आहे. यापुढील काळातही हे स्नेहबंध असेच कायम राहतील. पर्यटनाशिवाय उद्योग, आयटी, नगरविकास, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये ही महाराष्ट्राबरोबर देवाण-घेवाण करण्यास वाकायामा प्रांत उत्सूक आहे.

Web Title: MTDC agreement to Wakayama Province