एमटीडीसीची "जॉय राईड' पावसाळ्यानंतरही बंदच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई - मोठा गाजावाजा करत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सुरू केलेली मुंबई शहराची "जॉय राईड' जानेवारीपासून सुरू झाली. पावसाळ्यात बंद करण्यात आलेली ही सेवा 10 ते 15 दिवसांत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गोरेगावातील दुर्घटनेमुळे याबाबत सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग ऍण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) पाठोपाठ एमटीडीसीच्या वतीने जानेवारी 2016 मध्ये एमटीडीसीने मुंबईचे विहंगम दृश्‍य दिसेल, अशी "जॉय राईड' पवन हंसच्या मदतीने सुरू केली. या सफरीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पावसाळ्यातील सुरक्षिततेचा उपाय म्हणून ही राईड बंद करण्यात आली होती.

मुंबई - मोठा गाजावाजा करत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सुरू केलेली मुंबई शहराची "जॉय राईड' जानेवारीपासून सुरू झाली. पावसाळ्यात बंद करण्यात आलेली ही सेवा 10 ते 15 दिवसांत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गोरेगावातील दुर्घटनेमुळे याबाबत सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग ऍण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) पाठोपाठ एमटीडीसीच्या वतीने जानेवारी 2016 मध्ये एमटीडीसीने मुंबईचे विहंगम दृश्‍य दिसेल, अशी "जॉय राईड' पवन हंसच्या मदतीने सुरू केली. या सफरीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पावसाळ्यातील सुरक्षिततेचा उपाय म्हणून ही राईड बंद करण्यात आली होती. आता डिसेंबरचे 10 दिवस सरले तरीही ही राईड सुरू झालेली नाही. ही सेवा 10 ते 15 दिवसांत सुरू होईल, अशी माहिती पवनहंसचे महाव्यवस्थापक संजय कुमार यांनी दिली. गोरेगावात हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे ही स्थिती पूर्ववत होण्यास थोडे दिवस लागतील, त्यामुळे एमटीडीसीच्या सेवेला नेमका कसा प्रतिसाद मिळेल, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. जॉय राईडसाठी 3 हजार 200 रुपये घेतले जातात. सकाळी 10 ते 4 या वेळेत ही सेवा सुरू असते.

आयआरसीटीसीलाही हादरा
आयआरसीटीसीच्या वतीने मुंबईतील पर्यटन स्थळांचे विहंगम दृश्‍य पाहण्यासाठी "जॉय राईड' सुरू केल्यापासून चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र रविवारच्या दुर्घटनेमुळे ही सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना हादरा बसला आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर 10 डिसेंबर ही जॉय राईड बुक करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच्या फेऱ्यांची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. काही काळासाठी ही सेवा बंद करण्यात आली आहे का, हे विचारण्यासाठी वारंवार संपर्क करूनही कोणतेही उत्तर मिळाले नाही. 15 मिनिटांच्या या राईडसाठी 4 हजार 200 रुपये भाडे आहे.

Web Title: mtdc Joy Ride close after monsoon