
Mumbai : हरवलेल्या मुलीची पोलिसांमुळे पालकांशी भेट;मुलगी चुकीने चेन्नईतून मुंबईत दाखल
मुंबई - रेल्वेने चुकीचा प्रवास करून चेन्नईतून मुंबईत आलेल्या 16 वर्षीय मुलीची मुंबई पोलिसांमुळे कुटुंबीयांशी परत भेट झाली आहे.किरण शर्मा यांची मुलगी नावाची साक्षी वर्मा ही 16 वर्षीय मुलगी ही चेन्नई येथून घरी काही न सांगता मुंबईला रेल्वेने पोहोच.
यासंदर्भात साक्षी शर्माची आई किरण शर्मा यांनी चेन्नईतील निलागरे पोलीस ठाण्यात 17 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
मुलीचा चेन्नईमध्ये शोध घेतला परंतु तिचा पत्ता लागला नाही. त्यांनतर चेन्नई पोलिसांनी मुंबई पोलिसांना संपर्क करून मुलीसंदर्भात माहिती दिलीं .
हरवलेली मुलगी ही मुंबई दर्शन या गाडीतून प्रवास करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. अधिक चौकशी करून मुंबई दर्शनची गाडी जुहू येथे येत असल्याचे समजलें .तसेच पोलिसांनी गाडीचा नंबर व गाडीवरील ड्रायव्हरचा मोबाईल नंबर प्राप्त केला .
त्वरित स्थानिक जुहू पोलीसांनी गाडीच्या चालकाला संपर्क केला आणि त्याचे लोकेशन घेतले. लोकेशन मिळताच जुहू पोलीसांचे एक पथक जुहू तारा रोड येथे पाठवण्यात आले .
पोलिसानी मुलीला जुहू तारा रोड येथून सुखरूप ताब्यात घेतले. मुलगी भेटल्या बाबत तिच्या आईला किरण शर्मा यांना तसेच निलांगरे पोलीस ठाणे चेन्नई यांना माहिती देण्यात आली.