esakal | Mukesh Ambani:धमकीचं पत्र नेमकं कोणी पाठवलं? जैश -उल-हिंदच्या अस्तित्त्वाबाबतच प्रश्नचिन्ह

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani:धमकीचं पत्र नेमकं कोणी पाठवलं? जैश -उल-हिंदच्या अस्तित्त्वाबाबतच प्रश्नचिन्ह}

प्रथम जबाबदारी घेणाऱ्या आणि त्यानंतर खंडन करणारी जैश-उल-हिंद या संघटनेच्या अस्तित्त्वाबातच प्रश्नचिन्हे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mukesh Ambani:धमकीचं पत्र नेमकं कोणी पाठवलं? जैश -उल-हिंदच्या अस्तित्त्वाबाबतच प्रश्नचिन्ह
sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई:  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडले होते. याप्रकरणात प्रथम जबाबदारी घेणाऱ्या आणि त्यानंतर खंडन करणारी जैश-उल-हिंद या संघटनेच्या अस्तित्त्वाबातच प्रश्नचिन्हे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या संघटनेच्या अस्तित्त्वाबाबत अद्याप ठोस पुरावे नसून त्यांनी दिलेली बिटकाईनची लिंकही अस्तित्त्वात नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात या संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेली पोस्ट खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. एका टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश-उल हिंदने दावा केला होता. त्यात स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुखरुपपणे घरी पोहोचले आहेत. हा केवळ ट्रेलर होतो आणि पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. यात मुकेश अंबानी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी देण्यात आलेली बिटकाईनची लिंकच बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर या संघटनेच्या वतीने या प्रकरणातील सहभागाचे खंडन करणारी पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात आपलं हे कृत्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पण या संघटनेच्या अस्तित्त्वाबाबतच प्रश्नचिन्ह आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विशेष म्हणजे याच जैश-उल-हिंदने दिल्लीत इस्त्रायल दुतावासाबाहेर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पण पुढे याप्रकरणी तपास करणा-या दिल्ली पोलिसांनी याप्रकरणामागे दहशतवादी हात नसल्याचे म्हटले होते. दिल्लीत 1 महिन्यापूर्वी इज्राइल एम्बेसीच्या बाहेर स्फोट घडवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला होता.अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी कार ठेवल्यानंतर आता तशाच पद्धतीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. पण सध्यातरी सोशल मीडियावरील हे संदेश खोडसाळपणाच वाटत असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ 25 फेब्रुवारीला संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळली होती. त्यात जिलेटीन सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या मदतीने ती कार हटवण्या आली. अंबानी यांच्या एन्टेलिया या घराजवळील कारमिचेल रोडवर ही हिरव्या रंगाची कार संशयितरित्या उभी करण्यात आली होती. या कारबाबत माहिती मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या तपासणीत स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीन हे स्फोटक सापडले. पण स्फोट घडवण्याच्या दृष्टीने हे जिलेटीन एक्लोझीव डिवाईसला जोडण्यात आले नव्हते.

हेही वाचा- कोरोना लसीकरणाबाबत वृद्ध उत्साही, पहिल्या दिवशी इतक्या वृद्धांनी घेतली लस

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mukesh ambani explosives Threatening letter fake from Jaish-ul-Hind demands money