"रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल, हे घ्या 1 लाख 70 हजार रूपये बिल"

"रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल, हे घ्या 1 लाख 70 हजार रूपये बिल"

मुंबई : मुलुंड येथील ॲपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला सोमवारी आग लागल्याची घटना घडली. याचदरम्यान एका 82 वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला होता. तर फोर्टीस रूग्णालयात हलविण्यात आलेल्या दुसऱ्या रूग्णाचा सुद्धा मृत्यू झाला आहे.  

विरेंद्र सिंग असं पंचावन्न वर्षीय मृतकाचे नाव असून विरेंद्र सिंग यांना रात्री ऑक्सिजन अभावी फोर्टीसला हलविल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितलं. दरम्यान, रात्री आग लागल्यानंतर रूग्णाला फोर्टीस रूग्णालयात हलवल्याने  रूग्णालयाने 1 लाख 70 हजार रूपये एवढं एक दिवसाचा बील कुटुंबाकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त करत कुटुंबाने रूग्णालय रुग्णालय प्रशासनाविरोधात विरोधात संताप व्यक्त केला आहे.

रुग्णालयाच्या जनरेटरला आग लागून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून आग लागल्यानंतर आपल्या कुटुंबियांना शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव झाली. यापैकीच एक 55 वर्षांच्या विरेंद्र सिंग यांचे कुटुंबीय देखील होते. विरेंद्र सिंग यांचा याप्रकरणात दुर्दैवी मृत्यू झाला. पण, ते कुठल्या रुग्णालयात आहेत हे शोधण्यासाठी कुटुंबियांना पाच तास लागले.

रुग्णालय दुर्घटनेमध्ये दुर्देवी मृत्यू झालेल्या आपल्या वडीलांवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी त्यांचा मुलगा सुरज सिंग सकाळपासून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वणवण फिरत होता. पण, मृत्यू होऊन नऊ तास उलटून गेले तरी देखील अद्यापही त्यांना त्यांच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात मिळाला नव्हता.

विरेंद्र सिंग यांना मृत घोषित केले आणि 1 लाख 70 हजारांचे बिल विरेंद्र यांचा मुलगा सुरज सिंग याला देण्यात आले. यानंतर रुग्णालयाचा खर्च कोण उचलणार यासाठी फोर्टिस आणि अपेक्स रुग्णालयातील व्यवस्थापनाशी चर्चा सुरू झाली आणि त्याला दुपार उलटून गेली. तोपर्यंत सिंग यांच्या कुटुंबियांना त्यांचा मृतदेह सोपविण्यात आला नाही. बिल भरायचे तरी कसे हा प्रश्न त्यांच्या समोरही उभा ठाकणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे असे सिंग यांच्या कुटुंबातील रमेश गुप्ता यांनी सांगितले.

mulund apex hospital lift fire case second death recorder in unfortunate incident

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com