Mumbai : मुलुंडपाठोपाठ कांजूर, देवनार डंपिंग लवकरच होणार बंद; खासदार कोटक यांचा निर्धार | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : मुलुंडपाठोपाठ कांजूर, देवनार डंपिंग लवकरच होणार बंद; खासदार कोटक यांचा निर्धार

मुंबई - मुलुंडपाठोपाठ कांजूर, देवनार डंपिंग ग्राऊंड लवकरच बंद होणार असून मुंबईकरांना कचरा मुक्त करण्याचा निर्धार ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या केंद्र, राज्य सरकार व मुंबई महापालिका यांच्या माध्यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण गेल्या चार वर्षांपासून रस्ते, पूल, कचरा विल्हेवाट, शौचालये आदी विकासकामे करीत आहोत, अशी माहिती खासदार कोटक यांनी दिली.

मुलुंड येथील प्रदूषणकारी डंपिंग बंद करण्यात आले आहे. तळोजा येथे डंपिंगची जागा ताब्यात घेण्यात आली असून लवकरच कांजूर व देवनार डंपिंग ग्राउंड ग्राउंडही बंद होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना डंपिंग व कचऱ्याच्या समस्येपासून खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे, मुंबई कचरा मुक्त होणार आहे, अशी ग्वाही खासदार कोटक यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती दिली. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन रस्ते बांधण्यात येत आहेत. एलबीएस रोड, गोळीबार रोड, अंधेरी -, घाटकोपर लिंक रोड आदी कामे मार्गी लावण्यात येत आहेत. तसेच, विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार रेल्वे स्थानक येथील पुलांच्या गर्डरची कामे मार्गी लावली जात आहेत.

विद्याविहार रेल्वे स्थानक येथे परवाच्या दिवशीच १०० मिटर लांब व एक हजार मेट्रिक टन वजन गर्डरचे काम यशस्वीपणे पार पडले, अशी माहिती खासदार कोटक यांनी यावेळी दिली. याप्रसंगी, भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

कचऱ्यापासून वीज निर्मिती

देवनार डंपिंगवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत अशी माहिती खासदार कोटक यांनी दिली.

टॅग्स :Mumbai News