मुंबई औद्योगिक कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबईः शासनाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराच्या विरोधात मुंबई औद्योगिक कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समिती 1 ऑगस्टपासून आंदोलन करणार आहे, अशी माहिती उल्का महाजन आणि सहकारी यांनी दिली.

मुंबईः शासनाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराच्या विरोधात मुंबई औद्योगिक कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समिती 1 ऑगस्टपासून आंदोलन करणार आहे, अशी माहिती उल्का महाजन आणि सहकारी यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात गेली पाच वर्षे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर अंतर्गत दिघी पोर्ट विभागासाठी माणगाव रोहा तालुक्यातील ज़मीन संपादन सुरु आहे. म.औ.वि.अधिनियमान्वये हे संपादन सुरु असताना वाटाघाटीने जमिनी घेतल्या जातील सक्ती केली जाणार नाही असे शासन सातत्याने कागदोपत्री म्हणत राहिले. परंतु, शेतकऱयांवर सतत दबाव आणला गेला. जमीनी दिल्या नाहीत तर जबरदस्ती घेतल्या जातील, असा संदेश महसुल प्रशासन व गावातले दलाल सातत्याने देत राहिले. या बाबतीत विरोध करीत कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समिती रायगड उल्का महाजन, सन्देश कुलकर्णी, चंद्रकांत गायकवाड़, रमेश साळसकर, शिवाजी नाडर आणि चिंतामनी म्हसकर यांनी आंदोलने केली होती.

सरकारने दिलेला शब्द न पाळता आता मात्र सक्तीने जमिनी संपादित करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत. या जमिनींची नुकसान भरपाई ठरविताना 2013 च्या जमिन संपादन कायद्याचा अंमल देण्यात आलेला नाही.

सरसकट भाव एकरी 18 लाख 40 हजार रूपये ठरविण्यात आलेला आहे. त्यात घरे, विहिरी आणि झाडे आदींचे मूल्यांकन केले गेलेले नाही. शेतकरऱ्यांकडून लिहून घेतल्या जाणाऱ्या संमती पत्रात आम्ही नोकरी अथवा वाढीव नुकसान भरपाई मागणार नाही, असे लिहून घेतले जात आहे. ही शासनाकडून सरासर फसवणूक आहे. या फसवणूकीच्या आणि शासनाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराच्या विरोधात 1 ऑगस्टपासून माणगाव प्रांत कार्यालयासमोर आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत, अशी माहिती उल्का महाजन आणि सहकारी यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: mumabi news farmer land issue and government