पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - दहावी पेपरफुटीप्रकरणी अंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी आणखी एका शिक्षकाला अटक केली. रोहित सिंग असे त्याचे नाव असून तो बदलापूरमध्ये खासगी शिकवणी घेतो. परीक्षेच्या तासभर अगोदर तो शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेत येणाऱ्या प्रश्‍नाची उजळणी करून घेत होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रोहितला स्थानिक न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.23) पोलिस कोठडी दिली आहे.

अंधेरी पश्‍चिम येथील एका शाळेत सोमवारी (ता.19) पेपर फुटला होता. याप्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तीन शिक्षकांना नागपाडा आणि अंबरनाथ परिसरातून अटक केली. या प्रकरणात रोहितचा समावेश असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. मुंब्रा येथून समाजशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर रोहितला तो सोशल मीडियावर मिळाला. त्यानंतर त्याने विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी बोलावले. परीक्षेत येणाऱ्या प्रश्‍नांची त्याने विद्यार्थ्यांकडून उजळणी करून घेतल्याची माहिती समोर आली.

Web Title: mumabi news papaer leakage case one arrested