मुंबईत 100 उमेदवार अशिक्षित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या 2272 उमेदवारांपैकी शंभरहून अधिक उमेदवार शाळेची पायरीही चढलेले नाहीत. 

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या 2272 उमेदवारांपैकी शंभरहून अधिक उमेदवार शाळेची पायरीही चढलेले नाहीत. 

आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. जगाचे लक्ष या महापालिकेकडे असते. मात्र या निवडणुकीत अल्पशिक्षित आणि शाळेची पायरी न चढलेल्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांद्वारे आपली शैक्षणिक पात्रता जाहीर केली आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे. उच्चशिक्षित उमेदवारांनाच उमेदवारी देणार, असे उच्चरवाने सांगणाऱ्या राजकीय पक्षांनी अशिक्षितांनाही संधी दिली आहे. पाचवी ते नववीपर्यंत शिक्षण असणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. अपक्षांमध्ये शाळेची पायरीही न चढलेले अंगठेबहाद्दर उमेदवार शंभरहून अधिक आहेत. पदवी व उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या अत्यल्प आहे.

Web Title: Mumbai 100 unemployed candidates