वांद्रेत स्लॅब कोसळून दोघे जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

काही दिवसांपूर्वी वरळीच्या पोलिस वसाहतीत स्लॅप कोसळून एका महिलेला नऊ टाकले पडले होते. त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे गर्व्हमेन्ट काॅलनी किती सुरक्षित आहे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 

मुंबई : वांद्र्याच्या गव्हन्मेंट काॅलनीमध्ये आज (गुरुवार) पहाटे ४.३० वाजता स्लॅप कोसळला, या दुर्घटनेत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी कुटुंब झोपेत होते, त्याचवेळी ही घटना घडली. या दोघांवरही वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी वरळीच्या पोलिस वसाहतीत स्लॅप कोसळून एका महिलेला नऊ टाकले पडले होते. त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे गर्व्हमेन्ट काॅलनी किती सुरक्षित आहे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 

Web Title: Mumbai 2 injured slab collapsed in Bandra