मुंबईवरील दहशतवादी हल्ला ते कसाबची फाशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय साळसकर, लष्कराचे एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि एएसआय तुकारम ओंबळे यांना वीरमरण आले होते. दहशतवादी हल्ल्यावेळी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल आमीर कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला ते अजमल कसाबला देण्यात आलेल्या फाशीचा घटनाक्रम पुढीलप्रमाणेः

मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय साळसकर, लष्कराचे एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि एएसआय तुकारम ओंबळे यांना वीरमरण आले होते. दहशतवादी हल्ल्यावेळी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल आमीर कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला ते अजमल कसाबला देण्यात आलेल्या फाशीचा घटनाक्रम पुढीलप्रमाणेः

26 नोव्हेंबर 2008

 • 26 नोव्हेंबर, 2008 : कसाबसह नऊ दहशतवाद्यांचा मुंबईवर दहशतवादी हल्ला
 • 27 नोव्हेंबर, 2008 : मध्यरात्री 1.30 मिनिटांनी कसाबला जिवंत पकडण्यात यश, त्यानंतर नायर रुग्णालयात दाखल
 • 29 नोव्हेंबर, 2008 : दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेली सर्व ठिकाणे मुक्त, नऊ दहशतवाद्यांचा खात्मा
 • 30 नोव्हेंबर, 2008 : दहशतवादी हल्ला केल्याची कसाबकडून कबुली
 • 27/28 डिसेंबर 2008 : ओळखपरेड करण्यात आली

2009

 • 13 जानेवारी 2009 : 26/11 हल्ल्याच्या सुनावणीसाठी एम.एल ताहिलीयानी यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती
 • 26 जानेवारी 2009 : कसाबविरुद्ध गुन्हा चालवण्यासाठी आर्थर रोड कारावासाची निवड करण्यात आली.
 • 5 फेब्रुवारी 2009 : कसाबचे डीएनएचे नमुने कुबेर या नौकेवर सापडलेल्या वस्तूंबरोबर पडताळ्यात आले.
 • 20/21 फेब्रुवारी, 2009 :  सत्र न्यायालयासमोर कसाबचा कबुलीजबाब
 • 22 फेब्रुवारी, 2009 : उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड
 • 25 फेब्रुवारी, 2009 : कसाबसह दोघांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल
 • 1 एप्रिल, 2009 : कसाबच्या वकील म्हणून अंजली वाघमारे यांची निवड
 • 15  एप्रिल 2009 : अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून उचलबांगडी
 • 16 एप्रिल 2009 :  अब्बास काझमी कसाबचे नवे वकील
 • 17 एप्रिल 2009 : कसाबने आपला कबुलीजबाब पलटला
 • 20 एप्रिल 2009 : सरकारी वकिलांनी कसाबवर 312 आरोप ठेवले
 • 29 एप्रिल, 2009 : कसाब प्रौढ असल्याचं तज्ज्ञांचे मत
 • 6 मे, 2009 :  आरोप निश्चित, कसाबवर 86 आरोप ठेवले, मात्र कसाबकडून आरोपांचे खंडन
 • 8 मे, 2009 : पहिल्या साक्षीदाराची साक्ष, कसाबला ओळखले
 • 23 जून, 2009 : हाफिज सईद, झकी-ऊर-रेहमान लख्वी याच्यासह 22 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
 • 30 नोव्हेंबर, 2009 : अब्बास काझमींकडून कसाबचं वकीलपद काढून घेतले
 • 1 डिसेंबर, 2009 :  काझमींच्या जागी के पी पवार यांची निवड, सरकारी वकिलांनी आपला युक्तीवाद संपविला
 • 19 डिसेंबर, 2009 : कसाबकडून आरोपांचं खंडन

2010

 • 31 मार्च 2010 :  खटल्यातील तर्क संपले, विशेष न्यायाधीश एम.एल. ताहिलयानी यांनी निकाल 3 मेपर्यंत राखून ठेवला
 • 3 मे, 2010 : कसाब दोषी, तर सबाउद्दीन अहमद आणि फहीम अन्सारी यांची पुराव्याअभावी मुक्तता
 • 6 मे, 2010 : विशेष सत्र न्यायालयाकडून कसाबला फाशीची शिक्षा

2011

 • 21 फेब्रुवारी, 2011: कसाबच्याफाशीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णय कायम
 • 10 ऑक्टोबर, 2011 : पाकिस्तानचा दहशतवादी कसाबच्या फाशीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
 • 10 ऑक्टोबर, 2011 :  देवाच्या नावाखाली ब्रेनवॉश करुन हल्ल्यामध्ये आपला रोबोटसारखा उपयोग करुन घेतला, असे कसाबने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. तसेच आपले वय लहान असल्याने इतकी मोठी शिक्षा देऊ नये, अशी विनंतीही केली.
 • 18 ऑक्टोबर, 2011: सर्वोच्च न्यायालयाने, महाराष्ट्र सरकारची फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन अहमद यांच्याविरोधातील याचिका दाखल करुन घेतली.

2012

 • 31 जानेवारी, 2012 : खटल्यादरम्यान, स्वतंत्र आणि निष्पक्ष सुनावणी न  झाल्याचं कसाबने सर्वोच्च न्यायालयात सांगितले
 • 23 फेब्रुवारी, 2012 : सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकली आणि नरसंहाराचं सीसीटीव्ही फुटेज पाहिले
 • 25 एप्रिल, 2012 : अडीच महिन्यांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.
 • 29 ऑगस्ट, 2012 :  सर्वोच्च न्यायालयाकडून कसाबची फाशी आणि दोन भारतीय अतिरेक्यांची शिक्षा कायम ठेवली.
 • 16 ऑक्टोबर, 2012: कसाबचा दयेचा अर्ज फेटळण्यात यावा, अशी शिफारस गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना केली.
 • 5 नोव्हेंबर, 2012 : राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटळला
 • 8 नोव्हेंबर, 2012 : राष्ट्रपतींच्या निर्णयाची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिली
 • 18-19 नोव्हेंबर 2012 : कसाबला अतिशय कडेकोट बंदोबस्तात ऑर्थर रोड जेलमधून पुण्याच्या येरवडा कारागृहात हलवलं
 • 21 नोव्हेंबर, 2012 : पुण्याच्या येरवडा तुरुंगात क्रूरकर्म कसाबला फाशी

येरवडा कारागृहाच्या आवारातच अजमल अमीर कसाबचा दफनविधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai 26/11 terror attack to ajmal kasab hanging full timeline