लग्नाचे अमिष दाखवून 40 वर्षीय फॅशन डिझायनरवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape crime

मुंबईतील 40 वर्षीय फॅशन डिझायनरने मंगळवारी तिच्या शेजाऱ्यावर लग्नाच्या आश्वासना बदल्यात बलात्काराचा केल्याचा आरोप केला आहे.

Mumbai Crime : लग्नाचे अमिष दाखवून 40 वर्षीय फॅशन डिझायनरवर बलात्कार

मुंबई - मुंबईतील 40 वर्षीय फॅशन डिझायनरने मंगळवारी तिच्या शेजाऱ्यावर लग्नाच्या आश्वासना बदल्यात बलात्काराचा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. महिलेचा तिच्या पहिल्या पतीशी कायद्यानुसार घटस्फोट झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून आधी लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर त्या व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. महिलेने आरोपीविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत तक्रार दाखल केली आहे.

ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, 2012 साली महिलेचे पहिल्या पतीशी लग्न झाले होते आणि ती अंधेरीतील एका उंच इमारतीत राहत होती. 2018 मध्ये त्या इमारतीत महिलेच्या शेजारी आरोपी राहायला आला. तेव्हा त्यांची मैत्री झाली आणि तेव्हापासून त्यांच्यात घरी येणे जाणे सुरू कझले. 2018 मध्ये शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आरोपीचीपत्नी तिच्या मुलांसह तिच्या मूळ गावी गेली. तेव्हा आरोपीने महिलेला त्याच्या घरी बोलावले आणि तिला ग्लासात पिण्यासाठी रस दिला. ज्यूस प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली याचा फायदा घेत नकारानंतरही महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले.आरोपीने महिलेशी लग्न करण्याचे वचन दिले.

महिलेचे पतीसोबतचे वैवाहिक जीवन विस्कळीत होत असल्याने ती आरोपीच्या प्रेमात पडली असल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. जोडीदाराच्या अनुपस्थितीत दोघेही एकमेकांच्या घरी जवळीक करू लागले. काहीवेळा ते पंचतारांकित हॉटेलमध्येही आणि शारीरिक संबंध ठेवले. परंतु प्रत्येक वेळी त्याला लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने महिलेला आधी पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले.य पीडिता पतीपासून घटस्फोट घेत वेगळी झाली आणि ती दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. आरोपीला लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली असल्याचा महिलेचा आरोप आहे. ओशिवरा पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.