Mumbai : मुंबई विमानतळावर 32 कोटी किमतीचे 61 किलो सोने जप्त.. 7 आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : मुंबई विमानतळावर 32 कोटी किमतीचे 61 किलो सोने जप्त.. 7 आरोपींना अटक

मुंबई : मुंबई एअरपोर्ट कस्टमने एकाच दिवसात 61किलो सोने जप्त केले आहे. मुंबई विमानतळवर सीमा शुल्क विभागाने शुक्रवारी 11 नोव्हेंबरला कारवाई जप्त केलेल्या 61 किलो सोने सोने जप्त केले . या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 32 कोटी रुपये आहे. सीमा शुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई करत सात प्रवाशांना ज्यात 5 पुरुष आणि 2 महिलाना अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाच्या इतिहासातील सर्वाधिक उत्तम कामगिरीपैकी ही कारवाई गणली जात आहे.

पहिल्या कारवाईत सीमा शुल्क विभागाने चार भारतीय प्रवासी जर टांझानियामधून आले होते, त्यांच्याकडून 53 किलो सोने जप्त करण्यात आले असून चार ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी अतिशय हुशारीने सोन्याची तस्करी करत होते. आरोपींनी सोने कमरेच्या पट्ट्यात लपवून ठेवले होते. चौघांकडून 28.17 कोटी रुपयांचे 53 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. दोहा विमानतळावर सुदानी नागरिकत्व असलेल्या व्यक्तीने हे सोने आरोपीला दिले होतेचौघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुसऱ्या कारवाईत, गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई विमानतळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तीन प्रवाशांकडून (एक पुरुष आणि दोन महिला) 3.88 कोटी रुपयांचे 8 किलो सोने जप्त केले आहे. आरोपी दुबईहून विस्तारा कंपनीच्या विमानाने आले होते. त्याने आपल्या जीन्समध्ये मेणाच्या स्वरूपात सोन लपe होते. तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.