मुंबई : हायवे मृत्युंजयदुतांनी वाचवले 664 जणांचे प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : हायवे मृत्युंजयदुतांनी वाचवले 664 जणांचे प्राण

मुंबई : हायवेवर होणाऱ्या अपघातातील जखमींना मदत करण्सासाठी नेमलेल्या मृत्युंजय दुतांनी मार्च 2021 पासुन ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रभरात जवळपास 758 जखमींना रुग्णालयात पोहोचण्यात मदत केलीये, त्यातल्या 664 प्रवाशांचे जीव वाचवलेत. यात मुंबई- ठाणे विभागात सर्वात जास्त जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आलंय. मुंबई ठाणे विभागात मार्च 2021 पासुन 290 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यातल्या 234 जणांचे प्राण वाचवण्यात यश आल्याची माहीती महामार्ग पोलिसांनी काढलेल्या पत्रकात देण्यात आलीये.

हायवेवर अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. देशभरात दर वर्षी हायवे अपघातांत जवळपास दिड लाख प्रवाशांचा मृत्यू होतो. जखमींना वेळेवर मदत मिळत नाही, पोलिस मदतीसाठी वेळेवर पोहोचू शकत नाहीत, त्यामुळं मृत्युंची संख्या वाढते अपघातनंतरचा एक तास गोल्डन आवर समजला जातो, त्या एक तासात उपचार मिळाले, तर मृत्यूची शक्यता कमी होते, त्यामुळं तो एक तास अतिशय महत्वाचा असतो. यासाठीच महामार्ग अतिरीक्त पोलिस महासंचालक भुषणकुमार उपाध्याय यांनी 'मृत्युंजय दुत' या संकल्पने अंतर्गत मार्च 2021 मध्ये महामार्गांवर मदतीसाठी पथकं तयार केली आहेत.

हेही वाचा: मुंबई गोवा हायवेवर दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

यात हायवेवर असणारे मॉल्स, धाबे, हॉटेल्स यात काम करणारे कर्मचारी, तसंच हायवेलगतच्या गावांमध्ये राहणारे नागरिक यांची काही पथकं तयार करण्यात आलीयेत. त्यांना अपघात झाल्यानंतर काय करायचं, कशी मदत करायची, प्रथमोपचार कसे करायचे या सर्व गोष्टींचे त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांना स्ट्रेचर पुरवण्यात आलेत, तसंच जवळपासच्या रुग्णालयांचे नंबर्सही त्यांना देण्यात आलेत.

महाराष्ट्रात ठाणे, पुणे, नागपुर, औरंगाबाद या ठिकणाच्या हायवेंना अशा पथकांची नेमणुक करण्यात आलीये. या पथकांत 5 हजारांपेक्षा जास्त मृत्युंजय दुत कार्यरय आहेत. त्यामुळं पोलिसांवरचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी झालाय, आणि जखमंना वेळेवर उपचारही मिळतायेत, त्यामुळं अनेक जीव वाचलेत.

हेही वाचा: "ही वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी..."; नवाब मलिकांचं नवं ट्विट

चांगली कामगिरी करणाऱ्या पथकांना प्रशस्तिपत्र

ही पथकं तयार करताना स्थानिकांनी स्वयंस्फुर्तीनं यात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय, अनेक नागरीक यात स्वेच्छेनॉ सगभागी होतायेत, अशी माहामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालीये. तसंच मृत्युंजय दुतांचं मनोबल वाढावं यासाठी चांगलं काम करणाऱ्या मृत्युंजय दुतांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

loading image
go to top