Mumbai : पश्चिम रेल्वेची ७१ तिकीट दलालांना अटक! महिन्याभरात २६ लाखांची तिकिटे जप्त | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

train

Mumbai : पश्चिम रेल्वेची ७१ तिकीट दलालांना अटक! महिन्याभरात २६ लाखांची तिकिटे जप्त

मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना पकडण्याकरिता पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी कंबर कसली आहे. पश्चिम रेल्वेचा रेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलाला पकडले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त केली.

अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. तत्काळ तिकीट मिळविण्यासाठी अनधिकृत दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात.

त्यामुळे प्रवाशाना तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाची विक्री करण्यासाठी दलाल तिकीटघरासमोर असतात. इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांकडून या दलालांचा आधार घेत तिकीट घेण्ययात येते. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते.

हीच बाब निदर्शनास आल्याने आता पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी तिकीट दलाला विरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. मे महिन्याच्या १ ते २७ तारखेदरम्यान आरपीएफने ७१ तिकिट दलांलांवर ६३ गुन्हे दाखल केले.त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.

ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकीटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. १५ मे रोजी आरपीएफ आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने अलीम खान याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किंमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेउन अंधेरी आरपीएफ पोस्ट येथे गुन्हा दाखल केला.

अधिक चौकशी केली असता अलीम खानने तो साकी नाका येथील रहिवासी असल्याचे सांगत आपल्या सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खान खास २२ मे रोजी साकी नाका परिसरातून आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी दिली.