गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून ७२ लाखांची चोरी; ड्रायव्हरवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theft

गायक सोनू निगमच्या 76 वर्षीय वडिलांकडे पूर्वी कार्यरत ड्रायव्हर विरोधात 72 लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी बुधवारी ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai Crime : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून ७२ लाखांची चोरी; ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

मुंबई - गायक सोनू निगमच्या 76 वर्षीय वडिलांकडे पूर्वी कार्यरत ड्रायव्हर विरोधात 72 लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी बुधवारी ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनूची धाकटी बहीण निकिता हिने बुधवारी पहाटे ओशिवरा पोलिस ठाण्यात कथित चोरीची तक्रार दाखल केली.

गायक सोनू निगमचे वडील आगमकुमार निगम हे ओशिवरा, अंधेरी पश्चिमेकडील विंडसर ग्रँड इमारतीत वास्तव्यास आहेत आरोपी ड्राइव्हरने चोरी 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान घरात 72 लाख रुपये चोरल्याचा आरोप तक्रारीत सोनू निगमचे वडीलानी केला आहे. तक्रारीनुसार, आगमकुमार निगम यांच्याकडे रेहान नावाचा व्यक्ती जवळपास 8 महिने ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. पण त्याची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे त्याला अलीकडेच कामावरून काढून टाकण्यात आले.

रविवारी 19 मार्चला दुपारी आगमकुमार हे त्यांच्या मुलीच्या निकिताच्या वर्सोवा परिसरातील घरी जेवणासाठी गेले आणि काही वेळाने घरी परतले. संध्याकाळी, त्याने आपल्या मुलीला फोन करून लाकडी कपाटात ठेवलेल्या डिजिटल लॉकरमधून 40 लाख रुपये गहाळ झाल्याची माहिती दिली. दुसर्‍या दिवशी, आगमकुमार निगम व्हिसासंबंधी काही कामासाठी 7 बंगला येथे मुलीच्या घरी गेला आणि संध्याकाळी परत आला. त्याला लॉकरमधून आणखी 32 लाख रुपये गहाळ झाल्याचे आढळले.

आगमकुमार आणि निकिता यांनी त्यांच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्यामध्ये त्यांचा माजी ड्रायव्हर रेहान दोन्ही दिवस बाहेर असताना बॅग घेऊन त्याच्या फ्लॅटकडे जात असल्याचे दिसले. तक्रारीनुसार, आगमकुमार याना संशय आहे की रेहानने डुप्लिकेट चावीच्या मदतीने त्याच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि बेडरूममधील डिजिटल लॉकरमधून 72 रुपये चोरले. तक्रारीवरून, ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 380, 454 आणि 457 अंतर्गत चोरी आणि घरफोडीसाठी घुसखोरी केल्याबद्दल गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे.