esakal | Mumbai | ७७ टक्के कर्करोगग्रस्तांचा लशीला नकार
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

मुंबई : ७७ टक्के कर्करोगग्रस्तांचा लशीला नकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तब्बल ७७ टक्के कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये कोविड १९ लसीकरणाविषयी अजूनही साशंकता असल्याने त्यांनी लसीकरणाला नकार दिला आहे. दुष्परिणामांच्या भीतीमुळे लस घेण्यास ते इच्छुक नसल्याचा अहवाल टाटा मेमोरियल रुग्णालयाने मांडला आहे.जवळपास ७७ टक्के कर्करोग रुग्ण लस घेण्यास संकोच करतात. कारण त्यांना दुष्परिणामांची भीती वाटते. शिवाय केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमुळे कोविड लशीची वेळ पुढे ढकलली जात आहे. यासह माहितीचा अभाव आणि चुकीची माहिती असल्याने रुग्ण लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे.

कर्करोगग्रस्त रुग्णांना कोविड- १९ आजाराचा सर्वांत जास्त त्रास होतो. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. लसीकरण त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, असे कर्करोगशास्त्रज्ञ डॉ. श्रीपाद बनवली म्हणाले. डॉ. बनवली हे कर्करोग संशोधन, सांख्यिकी आणि प्रकाशित केलेल्या अभ्यासाच्या सह-लेखकांपैकी एक आहेत.

हे सर्वेक्षण ७ मे ते १० जून २०२१ दरम्यान ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये करण्यात आले. हे रुग्ण मोठ्या ट्यूमरने ग्रस्त होते. अभ्यासात एकूण ४३५ रुग्णांचा समावेश करण्यात आला. यापैकी ३४८ किंवा ८० टक्के रुग्णांना लशीचा एकही डोस मिळालेला नाही. १५.२ टक्के रुग्णांना पहिला डोस मिळाला होता आणि फक्त ४.८ टक्के रुग्णांना दोन्ही डोस मिळाले होते; तर २५९ किंवा जवळपास ७७ टक्के सर्वेक्षण केलेल्या रुग्णांमध्ये लसीबाबत साशंकता दिसून आली.

हेही वाचा: Corona Update : राज्यातील रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ

"कर्करोग आणि लसीकरण"

कोविड लस सक्रिय केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीवर असलेल्या कर्करोगग्रस्त रुग्णांना घेता येते.

कोविड लस कर्करोगाच्या उपचारात अडथळा आणत नाही किंवा कोणतेही अतिरिक्त दुष्परिणाम नाहीत.

कर्करोग रुग्ण कोविडमुळे असुरक्षित आहेत आणि त्यांच्यासाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे.

"गुंतागुंतीची समस्या"

कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाबाबत आजही कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये सांशकता आहे, असे प्रमुख आणि मान शल्यचिकित्सक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले; तर लशीसाठी संकोच ही एक गुंतागुंतीची समस्या आहे आणि ती धोरणात्मक, वैयक्तिक आणि संस्थेच्या पातळीवर हाताळली पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी याबाबतचे प्रशिक्षण आणि माहिती दिली पाहिजे, असे डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले.

loading image
go to top