मुंबई : आरेतील मुख्य रस्ता कॉंक्रीटचाच; पर्यावरण संघटनांची नाराजी

aarey forest Mumbai
aarey forest Mumbaisakal media

मुंबई : आरे मधून जाणाऱ्या मुख्य (Aarey main road) रस्त्याचे काँक्रीटीकरण (Road concrete) करण्याचा निर्णय झाला असून स्थायी समितीच्या मंजुरीनंतर (Sthayi samiti permission) प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. काँक्रीटीकरणामुळे या रस्त्यावरील रहदारी वाढून त्याचा त्रास आरे परिसरातील पशु-पक्षांना (Animals in danger) होण्याची भीती आरे बचाव आंदोलनात सक्रिय पर्यावरणवादी संघटनांनी (Environmentalist union fear) व्यक्त केली आहे.

aarey forest Mumbai
मुंबई| अंंधेरीत 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, 5 जण जखमी

आरेतील मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा तसेच अंतर्गत काही रस्ते चांगल्या स्थितीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या मंजुरीनंतर लवकरच आरेतील मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम ही सुरू झाले आहे.

हा मुख्य रस्ता 18 ऑगस्ट 2014 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात दिला. तेव्हापासून या रस्त्याची देखभाल मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. आरेतील अंतर्गत सुमारे 45 किलोमीटर रस्त्यांच्या दुरावस्थेतही वाढ झाली आहे. या रस्त्यांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. येथील अंतर्गत रस्त्याचे डांबर पुर्णत: निघाले असून रस्त्यांवर जागोजागी खड्डयाचे साम्राज निर्माण झाले आहे.

aarey forest Mumbai
विरार : शिवसेनेला खिंडार; 40 शिवसैनिकांचा 'बविआ'त प्रवेश

आरेतील 7.38 किमीचा मुख्य रस्ता दिनकर देसाई मार्ग हा सिमेंट कॉंक्रीटचा करण्यासाठी रुपये 47 कोटी मंजुर करण्यात आले.या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यानंतर सिमेंट्र कॉंक्रीटचे काम करण्यात आले आहे. आरेतील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने रुपये 3 कोटी 24 लाख 56 हजार 437 रुपये मंजुर केले असून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. 

रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. काँक्रीटीकरणाच्या कामामुळे आरे परिसरात मोठमोठ्या मशिनरी चालवाव्या लागतील,त्याचा त्रास परिसरातील पशु-पक्षांना होईल अशी भीती वनशक्ती संस्थेचे डी. स्टॅलिन यांनी व्यक्त केली आहे. पूर्वी हा काँक्रीटचा असणारा रस्ता काढून डांबराचा बनवण्यात आला. आता हा रस्ता पुन्हा एकदा काँक्रीट चा केला जात आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचा संशय ही स्टॅलिन यांनी व्यक्त केला आहे. रस्ता काँक्रीट चा बनवला तर रहदारी वाढेल,ट्रॅफिकची समस्या होईल. याचा फाटका आरे परिसर तसेच आतील जीव जंतूंना बसण्याची शक्यता पर्यावरणवादी झोरू भाथेना यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com