अर्जुन रामपाल चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल, जवळच्या मित्राला अटक

पूजा विचारे
Friday, 13 November 2020

आज अर्जुन रामपाल चौकशीसाठी हजर एनसीबीच्या कार्यालयात हजर झाला आहे. आता अंमली पदार्थ विरोधी पथक अभिनेत्याची चौकशी करेल. दरम्यान याआधी अर्जुन रामपाल यांच्या एका खास मित्राला एनसीबीनं अटक केल्याची माहिती मिळाली आहे. 

मुंबईः  काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. त्यानंतर अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले. त्यानुसार आज अर्जुन रामपाल चौकशीसाठी हजर एनसीबीच्या कार्यालयात हजर झाला आहे. आता अंमली पदार्थ विरोधी पथक अभिनेत्याची चौकशी करेल. दरम्यान याआधी अर्जुन रामपाल यांच्या एका खास मित्राला एनसीबीनं अटक केल्याची माहिती मिळाली आहे. 

आज सकाळी अर्जुनचा खास मित्र पॉल ग्रियाड याला एनसीबीनं ताब्यात घेतलं. गुरुवारी पॉलची चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. त्यानंतर त्याच्या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं. ड्रग्ज प्रकरणात अर्जुनचं नाव आल्यानं एनसीबीनं ही कारवाई केली. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीनं आपलं धाड सत्र सुरु ठेवलं आहे.  याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स हिची देखील चौकशी केली. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, गॅब्रिएला गुरुवारी देखील एनसीबीसमोर हजर झाली होती. बुधवारी गॅब्रिएलाची एकूण 6 तास चौकशी झाली होती.

गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. अॅगिसिलोस हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. अॅगिसिलोस हा एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. या प्रकरणात त्याचं नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Actor Arjun Rampal arrives Narcotics Control Bureau


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Actor Arjun Rampal arrives Narcotics Control Bureau