
Mumbai Air Pollution : मुंबई दिल्ली होण्याच्या वाटेवर; हवेची पातळी गंभीररित्या खालावली!
मुंबईकरांसाठी एक गंभीर बातमी समोर येत आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी प्रचंड खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांच्या हवेच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली आहे.
आज म्हणजेच सोमवारी मुंबईतली हवेची पातळी अतिशय खाली घरसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. मुंबईमध्ये २५६ AQI इतक्या दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईपेक्षा नवी मुंबईतलली हवा अधिक प्रदुषित असल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईत ३३२ AQI दूषित हवेची नोंद झाली आहे.
वाहनांचा धूर, परिसरातले कारखाने यामुळे ही गुणवत्ता घसरल्याची माहिती हाती येत आहे. चेंबूरमध्ये हवेची गुणवत्ता अधिक खालावली असून कुलाब्यातली हवेची गुणवत्ताही गंभीर प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे हवामान विभागाकड़ून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...
विशेषतः मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मुंबईची हवा वाईटहून अति वाईट पातळीवर गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे श्वसनाचा त्रास असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.