कस्टमची ऐतिहासिक कामगिरी! मुंबई विमानतळावर एका दिवसांत जप्त केलं तब्बल 61 किलो सोनं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

कस्टमची ऐतिहासिक कामगिरी! मुंबई विमानतळावर एका दिवसांत जप्त केलं तब्बल 61 किलो सोनं

मुंबई - मुंबई विमानतळावर आज कस्टम विभागाच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वात मोठी कारवाई झाली आहे. कस्टम विभागाने रविवारी मुंबई विमानतळावर एका दिवसात ३२ कोटी रुपये किमतीचे ६१ किलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी दोन महिलांसह सात जणांना अटक केली आहे. (mumbai airport customs seized 61 kg of gold)

हेही वाचा: Maharashtra Politics: "ठाकरेंचा सर्व वेळ पवार-काँग्रेसला संभाळण्यातच गेल्याने उद्योग हातातून गेले"

कस्टम डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात 4 भारतीय प्रवासी टांझानियातून आले होते. खास डिझाइन केलेल्या कमरेच्या बेल्टच्या खिशात त्यांनी सोनं लपवलं होतं. या चौघांकडून २८ कोटी १७ लाख रुपये किमतीचे एकूण ५३ किलो सोने जप्त करण्यात आले. युएईमध्ये खास डिझाइन केलेल्या बेल्टमध्ये सोन्याचे बिस्कीट लपविण्यात आले होते.

ट्रान्झिट टाइममध्ये दोहा विमानतळावर सुदानच्या एका नागरिकाने हा पट्टा सुपूर्द केला. दोहाहून येणाऱ्या चार भारतीय प्रवाशांना कतार एअरवेजच्या क्यूआर-५५६ या विमानात अडविण्यात आले. चौकशी केली असता ते टांझानियाहून येत असल्याचे समजले. त्याच्या शरीरावर सोन्याचे बार एका खास डिझाईन केलेल्या बेल्टमध्ये लपवून ठेवले होते, त्यात अनेक पॉकेट होते.

हेही वाचा: Sushma Andhare Vs Vaijnath Waghmare: सुषमा अंधारे पतीपासून वेगळ्या का झाल्या? वाचा सविस्तर

चौकशीदरम्यान चारही प्रवाशांनी दोहा विमानतळावर अज्ञात व्यक्तीने सोने दिल्याची कबुली दिली. या चारही प्रवाशांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दुसऱ्या एका प्रकरणात, मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी विमानाने दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून (एक पुरुष आणि दोन महिला) ३.८८ कोटी रुपये किंमतीचे ८ किलो सोने जप्त केले. मेणाच्या रूपात सोन्याची पेस्ट प्रवाशांनी घातलेल्या जीन्स पँटच्या कमरेजवळ लपवून ठेवण्यात आली होती.