मुंबई विमानतळाचा नवा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शनिवारी (ता. ८) २४ तासांत १००७ उड्डाणांचा नवा विक्रम केला. मुंबई विमानतळाने यापूर्वी पाच जूनला २४ तासांत १००३ उड्डाणांचा विक्रम नोंदवला होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा हिच्या विवाहासाठी मुंबईतील खासगी विमाने मोठ्या संख्येने राजस्थानकडे झेपावल्यामुळे हा नवा विक्रम झाल्याचे समजते. 

एकच धावपट्टी असणे ही मुंबई विमानतळाची मोठी मर्यादा आहे; मात्र विमान वाहतूक हाताळण्याचे कसब पणाला लावून नवे विक्रम होत आहेत. यापूर्वी ५ जूनला २४ तासांत १००३ विमानांची वाहतूक झाली होती, तर शनिवारी १००७ विमाने झेपावली अथवा उतरली. विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत; मात्र त्या एकमेकांना छेदत असल्याने एका वेळी एकच धावपट्टी वापरता येते. मुख्य धावपट्टीवरून तासाला ४८, तर दुसऱ्या धावपट्टीवरून तासाला ३५ विमानांची वाहतूक करता येते. या नव्या विक्रमाला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने दुजोरा दिला आहे.

मुकेश अंबानी यांची कन्या ईशा आणि पिरामल उद्योग समूहाचे आनंद पिरामल यांचा विवाह बुधवारी (ता. १२) मुंबईत होणार आहे. प्री-वेडिंग सोहळा जयपूर येथे सुरू आहे. त्या सोहळ्याला मुंबईतून अनेक मान्यवर गेल्यामुळे विमानतळावरील वाहतूक वाढल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Mumbai airport new record