विमान बिघडल्याने मुंबई विमानतळावरील वाहतूक खोळंबली

विमान बिघडल्याने मुंबई विमानतळावरील वाहतूक खोळंबली

मुंबई : मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर बुधवारी (ता. 14) सायंकाळी एका विमानात बिघाड झाल्यामुळे अनेक विमाने खोळंबल्याचे समजते. काही विमानांना 50 मिनिटे विलंब झाला, तर काही विमानांचे पर्यायी धावपट्टीवरून उड्डाण झाले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर "रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणि तपासणीत वाढ करण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांना दोन-अडीच तास आधीच विमानतळावर पोहोचावे लागत आहे; मात्र या कालावधीत तपासणीनंतर सायंकाळी मुंबई विमानतळावरून उड्डाण करत असताना तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे अनेक विमानांना विलंब झाल्याचे समजते; मात्र यासंदर्भात उशिरापर्यंत सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com