Mumbai Crime : बिग बी अमिताभ, उद्योगपती अंबानींच्या निवासस्थानी बॉम्ब स्फोटाची धमकी; दिव्यांग आरोपी अटकेत

नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तींची घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
crime
crimesakal
Summary

नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तींची घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तींची घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राजेश कडके असे अटक आरोपीचे नाव असून तो दिव्यांग असल्याची माहिती आहे. आरोपीला लोणीकंद पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीने फोन कॉल वरून प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

एका अज्ञात व्यक्तीने 28 फेब्रुवारी रोजी नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला. मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावण्यात आल्याचं सांगण्यात आले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलीस तात्काळ सतर्क झाले. मुंबई पोलिसांच्या बॉम्ब निरोधक पथकाने तात्काळ तिन्ही ठिकाणी जाऊन तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

crime
Sardesai Vs Deshpande: "चिल्लर लोकांवर बोलणार नाही"; देशपांडेंच्या आरोपांवर वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया

दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी 25 सशस्त्र लोक मुंबईतील दादरला पोहोचणार आहेत, अशी धमकीही निनावी फोन करणाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे. हे लोक कधी मुंबईत पोहोचणार आहेत. ते कुठे कुठे हल्ले करणार आहेत. याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस चक्रावून गेले असून पोलिसांनी फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली. पोलिसाना त्याच फोनचे लोकेशन पुण्यात सापडले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी पुण्यातील लोणीकंद येथून आरोपी राजेश कडकेला अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com