Mumbai : वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; घटनेने.. | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Mumbai : वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; घटनेने..

मुंबई : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या जाचाला कंटाळून घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यातच आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर यांनी फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

नाणेकर यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून घाटकोपर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले बाळकृष्ण नानेकर यांची काही दिवसांपूर्वी पुणे येथे बदली झाली होती. त्यामुळे त्यांनी पुणे येथे कुटुंबियांसह राहण्याचा निर्णय घेतला. तशी तयारी त्यांनी केली होती.मात्र घाटकोपर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना पुणे येथे जाण्याची परवानगी मिळत नव्हती.

गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात येत होता. त्यामुळे निराश झालेल्या नाणेकरांनी सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात असताना फिनेल प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ऑन ड्युटी असलेल्या इतर सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. बाळकृष्ण नाणेकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :Mumbai NewsCrime News