
मुंबई : ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांनी बनवली बोटकार
वाडा : ऑटोमोबाईल इंजिनिअरींगच्या तिस-या वर्षात शिकणा-या चार विद्यार्थ्यांनी जमिन व पाण्यावर चालणारी बोटकार बनवली असून ती यशस्वीपणे झाल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. तन्मय पाटील (चिंचघर पाडा, ता.वाडा ), प्रणय हाराळे (नवी मुंबई), दिप्तेश मांढरे (खांबाळा ता.भिवंडी) व चिन्मय चव्हाण (डोंबिवली) अशी त्या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत.
शहापूर येथे शिवाजीराव जोंधळे महाविद्यालय असून वरील चारही विद्यार्थी ऑटोमोबाईल इंजिनिअरींगच्या तिस-या वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांना महाविद्यालयाकडून प्रकल्प बनवायला सांगितला असता या चौघांनी एकत्र येऊन बोटकारची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी युट्यबवर सर्च करीत 1985 साली बनवलेली ब्रिटिश कालीन कार बघितली व त्याप्रमाणे त्यांनी एक वेगळ्या धाटणीची बोटकार बनवायला सुरवात केली.
यासाठी त्यांनी फायबर टॅक,बाॅक्स पाईप,स्पेंडर दुचाकीचे इंजिन, फोमलाॅक, लोडो टायर, कास्टींग राॅड, मेटल प्लेटस, डिस ब्रेक, चैन ड्राय व इको गाडीचे स्टिअरिंग असे साहित्य वापरून या चौघा विद्यार्थ्यांनी जमिनीवर व पाण्यावर चालणारी कार बनवली असून तिची चाचणी घेतली असता ती दोन्ही ठिकाणी व्यवस्थित रित्या चालत आहे. ही कार बनवायला त्यांना वीस दिवसांचा काळावधी लागला असून यासाठी 20 हजारांचा खर्च आला आहे. याकामी त्यांना इंजिनिअर काॅलजचे शिक्षक दिपक पाटील, महेंद्र पाटील, शिवाजी अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले. बोटकार यशस्वीपणे साकारल्यानंतर तिला प्रकल्पासाठी जोंधळे महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाचे शिक्षण व विद्यार्थी कौतुक करीत आहेत.
प्रतिक्रिया
युट्यबवर सर्च केल्यानंतर ब्रिटिश कालीन कार आम्हाला दिसली. त्यानंतर आम्ही चौघांनी वेगळ्या धाटणीची बोटकार बनवली आहे. ही कार जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी व्यवस्थितपणे चालत आहे.
Web Title: Mumbai Automobile Students Made A Boat Car
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..