Mumbai News : बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात आतापर्यंत ९ लाख लाभार्थी mumbai balasaheb thackeray aapala davakhana 9 lakh Beneficiary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

apala davakhana

Mumbai News : बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात आतापर्यंत ९ लाख लाभार्थी

मुंबई - हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंदर्गत एकूण १५९ दवाखान्यात आतापर्यंत ९ लाख ३ हजार ५४५ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे.

गेल्या १७ नोव्हेंबर रोजीच्या पुण्यतिथी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. सुरूवातीच्या महिन्यात सरासरी लाभार्थींच्या वाढीच्या संख्येने आता वेग घेतला आहे. सुरूवातीच्या काळात म्हणजे नोव्हेंबर २०२२ मध्ये असणारा २ महिने ७ दिवस इतक्या एक लाख लाभार्थींची संख्या गाठण्याचा वेळ आता १५ दिवसांवर आला आहे. त्यासोबतच दवाखान्यांच्या संख्येतही वेगाने भर पडलेली आहे. अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत १५९ पर्यंत दवाखान्यांची संख्या पोहचली आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी दवाखान्यांच्या संख्येत भर पडतानाच प्रत्येक एक लाख लाभार्थींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. एकूण १५९ दवाखान्यांच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या आता ९ लाखांवर पोहचली आहे. म्हणजेच लाभार्थ्यांची संख्या आता दशलक्ष होण्याच्या दिशेने सरकते आहे.