मुंबई झाली गारेगार, कोकणात जोरदार पावसाचा अंदाज

समीर सुर्वे
Tuesday, 22 September 2020

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज सकाळी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या

मुंबई,ता.22: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज सकाळी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर मुंबईत गारवा जाणवत होता. तर पालघरमधिल काही भागात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरीत कोकणातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मोठी बातमी - तब्बल 14 हजारांहून अधिक कैद्यांची झालीये कोरोना चाचणी, साथ नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या

मुंबईत कुलाबा येथे आज संध्याकाळपर्यंत कमाल 28.2 आणिि किमान 26 अंश सेल्सिअसची नोद झाली. तर सांताक्रुझ येथे कमाल 27 अंश आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अंधेरीत सर्वाधिक 57 मिमी सांताक्रुझ येथे 47.4 मिमी आणि कुलाबा येथे 24.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. इतर ठिकाणीही सकाळी पावसाची जोरदार सर कोसळून दिवसभर गारवा जाणवत होता.

मोठी बातमी - भय इथले संपत नाही, कोरोनावरील इंजेक्शनसाठी रूग्णालयांची फरफट

कमी दाबाच्या पट्ट्याचा उद्याही प्रभाव राहाणार आहे. पालघर जिल्ह्यातील काही भागात 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी अंबर अलर्ट जारी करण्यात आला असून नाविक दल तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण बल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्जतेचा इशारा देण्यात आला. मुंबईसह उर्वरीत कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai became chilled due to low pressure belt in bay of bengal and monsoon showers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai became chilled due to low pressure belt in bay of bengal and monsoon showers