Mumbai BEST Bus : तपासणीनंतर २०५ बसेस प्रवासी सेवेत!

आगीच्या घटनेनंतर ५० टक्के बसेस ताफ्यात
Mumbai BEST Bus fire incident 205 buses passenger service inspection
Mumbai BEST Bus fire incident 205 buses passenger service inspectionesakal news

मुंबई - मुंबईत बेस्ट बसने पेट घेण्याच्या घटनांनंतर बेस्ट उपक्रमाने मातेश्वरी कंपनीच्या बसेसवर बंदी घातली होती. भाडेतत्त्वावरील ४०० बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र लखनौ येथून मुंबईत दाखल झालेल्या टाटा मोटर्सची टीमने या बसेसची तपासणी केली.

Mumbai BEST Bus fire incident 205 buses passenger service inspection
Mumbai Crime : दारासमोर चप्पल ठेवल्याच्या रागातून वाद; जोडप्याने केली शेजारच्याच हत्या

तपासणीनंतर हिरवा कंदील मिळालेल्या या २०५ बसेस आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसेस लवकरच प्रवासी सेवेत येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. मातेश्वरी कंपनीच्या एकूण ४१२ बसेसची सेवा २३ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली होती.

Mumbai BEST Bus fire incident 205 buses passenger service inspection
Mumbai BEST Bus : बेस्टच्या डबल डेकरला मुंबईच्या रस्त्यांचा दणका

मातेश्वरी कंपनीच्या बसेसना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांनंतर लखनौ येथून टाटा मोटर्सची टीम दाखल झाली. टाटा मोटर्सने ४१२ बसेसची तपासणी केली आणि त्यापैकी २०५ बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यास हिरवा कंदील दिला. त्यानंतर आता मातेश्वरी कंपनीच्या ४१२ बसेसपैकी २०५ बसेस प्रवासी सेवेत रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com