esakal | Mumbai: यंदाही बेस्टची तिकीट दरवाढ नाही
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्ट
मुंबई : यंदाही बेस्टची तिकीट दरवाढ नाही

मुंबई : यंदाही बेस्टची तिकीट दरवाढ नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी आर्थिक वर्षात बेस्टने तिकीटांच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला असून येत्या काळात नव्या चकाचक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे.बेस्ट प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करता यावे यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे.बेस्ट उपक्रमाचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी आज बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना सादर केला आहे.बेस्टचा पाय अधिकच खोलात गेला असून आगामी वर्षात तब्बल 2 हजार 236 कोटी 48 लाख रुपयांची तुट राहाणार असल्याचे या अर्थसंकल्पात नमुद आहे.

बेस्टला वाहतूक आणि विज पुरवठा यातून 4 हजार 997 कोटी 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.तर,खर्च 7 हजार 233 कोटी 52 लाख रुपयांचा अंदाजित आहेत.विज पुरवठा विभागात 126 कोटींची आणि वाहतुक विभागाला 211 कोटी 47 लाख रुपयांचा तोटा अंदाजित आहे.प्रकल्पांवर बेस्ट 695 कोटी 18 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

हेही वाचा: मुंबई : कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका, डोळ्यांच्या समस्या वाढल्या

महाव्यवस्थापकांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आगामी वर्षात तिकीट दरवाढ न होण्याचे संकेत देण्यात आले.त्याच बरोबर बेस्टच्या डिजीटायलायझेशनवरही भर देण्यात येणार आहे.यात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड,डेबिट क्रेडीट कार्ड बरोबरच ऑनलाईन तिकीट पैसे भरण्याची सोयही उपलब्ध करण्यात येणार आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बेस्ट बसेची सध्यस्थीती समजणार आहे.प्रवास करायची बस कोठवर आली हे मोबाईलवर समजणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होईल असे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी नमुद केले.

2023 पर्यंत इलेक्ट्रीक वाहाने

डिझेल,नैसर्गिक वायूवरील वाहाने बंद करुन बेस्ट ईलेक्ट्रीक वाहानांची संख्या वाढविणार आहे.2023 पर्यंत बसेचा 50 टक्के ताफा ईलेक्ट्रीक असेल तर 2027 पर्यंत 100 बसेस या ईलेक्ट्रीक असतील असेही या अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले.पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्व पुर्ण पाऊले उचलली जात असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

दर्जेदार सेवेसाठी 2100 वातानुकूलीत बसेस

येत्या काळात बेस्टच्या ताफ्यात 2100 बसेस दाखल होणार आहेत.यामध्ये 1400 सिंगल डेकर वातानुकूलीत,400 मिडी वातानुकूलीत आणि 100 मिनी वातानुकूलीत बसेस असतील.त्याच बरोबर 200 डबल डेकर वातानुकूलीत बसेस ताफ्यात दाखल होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

हेही वाचा: सांगली : पाटील यांनी बेकायदेशीर प्रक्रिया राबवून गाळे घेतले- डांगे

पेपरलेस कारभार

बेस्ट बसेसचा कारभार पेपरलेस करण्यासाठी विविध योजना आणण्यात येत आहे.त्याच बरोबर विज विभागाचा कारभारही पेपरलेस करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.सध्या 65 टक्के ग्राहक ऑनलाईन विज बिल भरत असून आगामी वर्षात हे प्रमाण 80 टक्क्यां पर्यंत वाढविण्याचे ध्येय असल्याचे लोकेश चंद्र यांनी जाहीर केले.

महिलांसाठी सुसाट

महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करण्या बरोबरच आपात्कालीन परीस्थीतीत मदतीसाठी मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तंत्रज्ञान विकसीत करण्यात येणार आहे.या ॲप्लिकेशनच्या मदतीने तत्काळ महिलांना मदत पोहचविणे शक्य होणार आहे.

‘ईलेक्ट्रीक बसेसची संख्या वाढविण्या बरोबरच पेपरलेस कामकाजाकडे वाटचाल करण्याचा बेस्टचे प्राधान्य आहे.त्याच बरोबर प्रवासी आणि विज ग्राहकांना अधिक सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.-लोकेश चंद्र,महाव्यवस्थापक बेस्ट

हेही वाचा: बेळगाव : 'रायण्णा' मालमत्ता अखेर ताब्यात

बेस्ट उपक्रम अधिकाधिक स्मार्ट आणि ग्राहकाभिमूक करण्यावर भर दिला जात आहे.प्रवाशांचा वेटींग कालावधी कमी करण्यासाठी बसेसचा ताफा वाढविण्यात येत आहे.तसेच,विज ग्राहकांसाठी विविध योजना आणल्या जात आहेत.आर्थिक चणचणीची झळ बेस्ट प्रवासी आणि विज ग्राहकांना पोहचू न देण्यासाठी भाडेवाढीत वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.- आशिष चेंबूरकर,बेस्ट समिती अध्यक्ष

विरोधक नाराज

बेस्टची अर्थसंकल्पीय बैठक ऑनलाईन झाली.बैठकीत महाव्यवस्थापकांनी अध्यक्षांना अर्थसंकल्पाची प्रत सादर केली.मात्र,सदस्यांना संध्याकाळ पर्यंत ही प्रत मिळाली नव्हती.त्यावर पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा आणि भाजपचे बेस्ट सदस्य सुनिल गणाचार्य यांनी नाराजी व्यक्त केली.मात्र,ऑनलाईन बैठक असल्याने रात्री पर्यंत ही प्रत सदस्यांना पोहचली असा दावा अध्यक्ष चेंबूरकर यांनी केला.

loading image
go to top