Mumbai : चक्क स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस

अंधश्रद्धेला फाटा देत मोहने येथील गौतम मोरे यांचा उपक्रम
Birthday celebrated
Birthday celebratedsakal

डोंंबिवली : अंधश्रद्धेला फाटा देत नविन विचारांचा पायंडा पा़डण्यासाठी मोहने येथील गौतम मोरे यांनी आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला. मोरे यांचे नातेवाईक, मित्र मंडळी यांनी देखील मोठ्या उत्साहात स्मशानभूमीत येत वाढदिवसाचा आनंद लुटला. स्मशानभूमी हे अपवित्र ठिकाण मानले जाते, रात्री येथे गेले की भूत पाठी लागतात अशा अनेक अंधश्रद्धा नागरिकांच्या मनात आहेत. या विचारांना फाटा देत नविन विचार रुजविण्याची सुरुवात आपल्या पासून झाली पाहीजे या उद्देशाने यंदा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्याचे ठरविल्याचे यावेळी मोरे यांनी सांगितले.

कल्याण जवळील मोहने येथील उल्हास नदी काढच्या स्मशानभूमत रात्री 12 च्या सुमारास गौतम यांनी आपला वाढदिवस केक कापित व नातेवाईकांना चिकन बिर्याणी आस्वाद देत साजरा केला. स्मशानभूमी म्हटले की सामान्य माणसाच्या उरात धडकी भरते. दुपारी 12, सायंकाळी 7, रात्रीचे 12 वाजले की स्मशानभूमी जवळून जाणे अनेकजण आजही टाळतात. वंशपरंपरागत चालत आलेल्या संकल्पनांतून माणसांनी पिंपळ, वडाचे झाड, ओढा, विहिर, स्मशानभूमी आदि ठिकाणी भूतांचे वास्तव्य असते असे लहानपणीच बालमनावर बिंबवल्याचे पहायला मिळते. केवळ लहान मुले नाही तर अबाल वृद्धांचा देखील या संकल्पनांवर विश्वास असतो. याच संकल्पनांना छेद देण्यासाठी तसेच स्वर्गीय दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन या चळवळीतील खारीचा वाटा उचलणण्यासाठी स्मशानभूमी येथे वाढदिवस साजरा करण्याचा विचार केला. नातेवाईक, मित्र मंडळी यांनी देखील मला पाठींबा दिला.

अंधश्रद्धे विरोधात एकीकडे समाज प्रबोधनासाठी शिक्षित तरुण-तरुणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत स्वतःला झोकून देत काम करतात. तर दुसरीकडे सुशिक्षित असणारा समाजातील काही घटक अंधश्रद्धे पोटी बकऱ्यास कोंबड्यांचे बळी व उतारा देत आहे. भूतबाधा, भानामती यांवरही आज अनेकांचा विश्वास आहे. फसवेगिरी केल्याने अनेक भोंदूबाबा आज कारागृहात गेले असताना त्यांचे शिष्य मात्र त्यांच्यापाठी त्यांचा व्यवसाय चालवत आहेत. महापुरुषांचे विचार कागदावरच राहीले असून भूत भानामती जे अस्तित्वात नाही त्यावर नागरिकांचा विश्वास आहे. हे कुठेतरी थांबले पाहीजे यासाठी एक वेगळा प्रयोग आम्ही केला. रात्रीच्या वेळेसही महिला, लहान मुले स्मशानभूमीत आली होती. चिकन बिर्याणी यावेळी सर्वांनी खाल्ली आणि त्यांना कोणताही त्रास झालेला नाही हेच आम्ही यातून दाखवून दिल्याचे मोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com