विकास रथाच्या नावाने  भाजपचा मुंबईत प्रचार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार विकास रथाच्या माध्यमातून भाजपने सुरू केला आहे. या विकास रथावरून भाजप आणि शिवसेनेत टीकेची साठमारी सुरू झाली.

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार विकास रथाच्या माध्यमातून भाजपने सुरू केला आहे. या विकास रथावरून भाजप आणि शिवसेनेत टीकेची साठमारी सुरू झाली.

"काही जणांची सवय जात नाही. त्याकडे आपण लक्ष देत नाही,' अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे, तर "त्यांना त्यांचा खेळ करू द्या,' असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मारला आहे. मुंबईत विकास निर्माण रथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या विकास निर्माण रथात महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांत केलेली मुंबई व कोकणातील विकास कामे व मुंबई शहर सुरक्षित व सुंदर करण्यासाठी उचलेली पावले याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी चित्रफीत तयार करण्यात आली आहे. 

Web Title: Mumbai BJP convention