मुंबईत लसीकरणाची गती वाढवण्यासाठी पालिका करतेय नवा विचार

मुंबईत लसीकरणाची गती वाढवण्यासाठी पालिका करतेय नवा विचार

मुंबई: मुंबईत लसीकरणाची गती वाढवण्यासाठी पालिका डायलिसिस केंद्रांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारीही पालिकेने केली आहे. मुंबईतील राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांशी जोडलेल्या डायलिसिस केंद्रांनाच लसीकरण केंद्रे बनवले जाईल. केंद्र सरकारने काही डायलिसीस केंद्रांची यादीही पालिकेकडे पाठवली आहे. 

कोरोनाची लस सध्या मुंबईतील 43 केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचारी, अग्रभागी, ज्येष्ठ आणि 45 वर्षांवरील वृद्ध आणि आजारी रुग्णांना दिली जात आहे. या 43 केंद्रांपैकी 22 केंद्रे महापालिकेची आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी सांगितले की, आता मुंबईतील डायलिसिस सेंटर लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत. याचा सर्वात मोठा फायदा त्या डायलिसिस रूग्णांना होणार आहे जे डायलिसिससाठी तेथे जातात.  गोमारे यांच्या म्हणण्यानुसार, पीएमजेवाय, एमपीजेवायए आणि सीजीएचएस सरकारी आरोग्य योजनांशी जोडलेल्याच केंद्रांना लसीकरण केंद्र म्हणून तयार केले जाईल. लसीकरणाला परवानगी देण्यापूर्वी हे केंद्र लसीकरणाच्या कामासाठी योग्य आहे की नाही याची खात्री केली जाईल. 

या केंद्रांमध्ये लसीचा साठा, लसीकरणानंतर आवश्यक असलेली प्रतिक्षा रुम, निरीक्षणाचे क्षेत्र, लसीसाठी योग्य जागा आणि लसीच्या दुष्परिणामांबाबत रूग्णांवर उपचार करण्याच्या सुविधा डायलिसिस केंद्रांवर आहेत की नाही? या सर्वांचा आढावा घेतल्यानंतरच डायलिसिस केंद्रांवर लसीकरणाचे काम सुरू होईल. 

दरम्यान, मुंबईतील लसीकरणाचा वेग आणि संख्या वाढावी यासाठी पालिकेकडून दोन शिफ्टमध्ये काम केले जाणार आहे. त्यामुळे, जर लोकांनी आणि कोविन पोर्टलने साथ दिली तर येत्या काही दिवसात लसीकरणाची गती वाढलेली पाहायला मिळेल असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai bmc preparing start vaccination centers the dialysis centers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com