बाँबस्फोटातील संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांतील संशयित आरोपी अहमद आलम शेख ऊर्फ अहमद लंबू (वय ५२) याला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एसीबी) शुक्रवारी अटक केली. साखळी बाँबस्फोटांचा तपास करीत असलेल्या सीबीआयने त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी शेख हा खालीद नावाने वावरत होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्‍वासू असलेला शेख स्फोटानंतर दुबईला गेला होता. 

Web Title: mumbai bom blast suspect arrested