मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझीचा कराचीत मृत्यू - सूत्र

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे हे दोघेही जवळचे सहकारी होते.
Sameer Ghazhi
Sameer Ghazhi

मुंबई : मुंबईतील सन १९९३ च्या बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी आणि डॉन छोटा शकीलचा (Chhota Shakeel) जवळचा सहकारी सलीम गाझी (Sameer Ghazhi) याचा पाकिस्तानातील कराची (Karachi) येथे मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं दिली आहे. (Mumbai Bomb blast accused and Chhota Shakeel close aid Salim Ghazhi died in Karachi Pakistan)

१२ मार्च १९९३ रोजी झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटामध्ये सुमारे २५७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जण जखमी झाले होते. दरम्यान, या बॉम्बस्फोटातील आरोपी युसुफ मेमन (वय ५४) याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या स्फोटांचा सूत्रधार टायगर मेननचा तो भाऊ होता.

Sameer Ghazhi
Punjab Election : काँग्रेसनंतर आता भाजपचीही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

युसुफचा भाऊ टायगर मेमन हा या बॉम्बस्फोटातील सहसूत्रधार होता. दाऊदच्या मदतीनं त्यानं हा कट रचला होता. या स्फोटासाठी दाऊदनं रायगड जिल्ह्यातील शेखाडी बंदरात आरडीएक्स उतरवलं होतं. तर टायगर मेमन याच्याकडे ही स्फोटकं मुंबईत पोहोचवण्याची जबाबदारी होती. टायगरचा दुसरा भाऊ याकुब मेमन याला २०१५ मध्ये फाशी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com