वांद्रे-वरळी सी लिंकवर बेकायदा होर्डिंग मुंबई पालिकेचा दावा

वांद्रे-वरळी सी लिंकवर बेकायदा होर्डिंग मुंबई पालिकेचा दावा

मुंबईः वांद्रे वरळी सागरी सेतूवर दोन होर्डिंग असल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. मात्र या मार्गावर तब्बल 12 होर्डिंग असून पालिकेने दिलेल्या माहितीमुळे उर्वरीत 10 होर्डिंग बेकायदा असल्याची शक्यता आहे, असा आरोप आज भाजपने विधी समितीच्या बैठकीत केला.

मुंबईतील होर्डिंगचे वार्षिक स्ट्रक्चरल ऑडिट करावे असा ठराव महासभेने जानेवारी 2019 मध्ये केला होता. त्या ठरावावर प्रशासनाकडून विधी समितीत उत्तर सादर करण्यात आले आहे. संबंधित होर्डिंग आणि ज्या इमारतीवर होर्डिंग उभारण्यात येणार आहे. त्या इमारतीच्या स्थैर्यतेचा दाखल सादर करणे बंधनकारक आहे. तसेच दर दोन वर्षांनी या परवान्याचे नुतनीकरण करावे लागते असा दावा पालिकेने केला आहे. यावर भाजपचे अभिजित सामंत यांनी सी लिंकवर बेकायदा होर्डिंगचा मुद्दा उपस्थित केला. या मार्गावर तब्बल 12 बेकायदा होर्डिंग आहेत असा दावा त्यांनी केला. मात्र पालिकेने केलेल्या पाहाणीत दोन होर्डिंग आढळले असल्याचे नमुद केले आहे. पालिकेच्या या दाव्यामुळे उर्वरीत 12 होर्डिंग बेकायदा असून त्याबाबत पालिकेकडून लपवा छपवी केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 
होर्डिंग पडून अपघात घडल्याचे प्रकार काही वेळा घडले आहे. पुण्यात काही जणांचा जीवही गेला होता. त्याबाबत बैठकीत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. मात्र होर्डिंगना परवानगी देताना अपघात झाल्यास विमा काढण्यात येतो, असा दावा पालिकेने केला आहे.

महापालिकेने 1 हजार 151 होर्डिंगना परवानगी दिलेली आहे. त्यातून 2019-2020 या आर्थिक वर्षात पालिकेला 163 कोटी 52 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 97 होर्डिगमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याने त्यापैकी 59 होर्डिंगना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यातील 9 होर्डिंग काढून टाकण्यात आले. तर 8 होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत आणि 3 होर्डिंगना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. पाच जाहिरात कंपन्यांनी उच्च न्यायालयात दावा दाखवला आहे. दोन होर्डिंग काढून टाकण्यात आले.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Bombay Municipal Corporation claims illegal hoarding Bandra Worli sea link

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com