
बुकी अनिल जयसिंघानीना सोमवार 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अनिलची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिच्या पोलीस कोठडीत शुक्रवार 24 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Mumbai Crime : बुकी अनिल जयसिंघानी, अनिक्षा जयसिंघानीची रवानगी पोलीस कोठडीत
मुंबई - बुकी अनिल जयसिंघानीना मुंबईतील सत्र न्यायालयाने सोमवार 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अनिलची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिच्या पोलीस कोठडीत शुक्रवार, 24 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अनिक्षाची अजून 7 दिवसांची कोठडी पोलिसांनी मागितली होती. परंतु, न्यायालयाने 4 दिवस 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी या तिघांना अटक करण्यात आली होती.
बंद लिफाफ्यातील चिठ्या
आरोपी अनिक्षा पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोपी पोलिसांनी केली आहे. या गुन्ह्यात आणखी दोन आरोपीना पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी अनिक्षाची आणखी दोन आरोपींच्या समोरसमोर बसवून चौकशी पोलीस करणार आहे. अनीक्षाने चिठ्या बंद लिफाफ्यात अमृता फडणवीस यांना दिल्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याचा मजकूर पोलिसांकडून तपासला जात आहे. सांकेतिक भाषेत सगळा मजकूर असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
व्हिडिओ उघड
आरोपी अनिक्षासोबत इंटरनेटसाठी वापरण्यात येणारा डोंगलसुद्धा जप्त करण्यात आला आहे. जवळपास 100 जीबीपेक्षा जास्त डाटा वापरला गेला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलीस तपासात काही व्हिडिओ संदर्भात माहिती उघड झाली आहे. त्यातील एका व्हिडिओत अनिक्षा बॅगमध्ये पैसे भरताना दिसत आहे. ते पैसे कुठे आहेत, कुठून आणले होते याचा पोलीस तपास करत आहे. कुठल्या परिस्थितीत व्हिडिओ बनवले याचीही माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपी अनिल जयसिंघानी आणि अनीक्षा जयसिंघानी यानी संगनमताने कट रचलेला होता का यामागे कोण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
प्रकरण थोडक्यात
72 तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर, मुंबई पोलिसांनी अखेर रविवारी रात्री 11.45 वाजता जयसिंघानीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुजरातमध्ये अटक केली. वाँटेड बुकी अनिल जयसिंघानीचा पाठलाग गुजरातमधील बारडोली ते सुरत ते वडोदरा ते कलोलसारख्या शहरांमधून मुंबई पोलिसांची 3 पथक त्याचा पाठलाग करत होती. अखेर गेल्या पाच वर्षांपासून फरार अनिल जयसिंघानीला पोलिसांनी अटक केली. जयसिंघानी 15 गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी रोजी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा विरुद्ध ब्लॅकमेल, धमकावणे आणि एक रुपयाची ऑफर दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांच्या रडारवर जयासिंघानी आला होता. या प्रकरणात अनिक्षाला 16 मार्च रोजी अटक करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.