गुगलची नोकरी सोडून सुरु केलं स्वतःचं किचन, आता मिळतंय ५० लाखांचं उत्पन्न... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुगलची नोकरी सोडून सुरु केलं स्वतःचं किचन, आता मिळतंय ५० लाखांचं उत्पन्न...

मुनाफच्या किचनमधील थाळी बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्र्यांनी चाखली आहे. यामध्ये अभिनेते ऋषी कपूर, ह्रितिक रोशन आणि राणी मुखर्जी यांचा समावेश आहे.

गुगलची नोकरी सोडून सुरु केलं स्वतःचं किचन, आता मिळतंय ५० लाखांचं उत्पन्न...

मुंबई : ही बातमी आहे तुम्हा आम्हा सर्वांना इन्स्पायर आणि मोटिवेट करणारी. बातमी आहे मुंबईतील तरुणाची आणि त्याच्या बिझनेसची. तुम्हा आम्हाला गुगल, फेसबुक अशा ठिकाणी आपल्याला नोकरी मिळाली तर किती भारी होईल, असं कायम वाटतं. एका बड्या कंपनीत नोकरी मिळाली की आपलं आयुष्य सेट असं आपल्याला कायम वाटतं. मात्र मुंबईतील या तरुणाने थेट गुगलच्या नोकरीवर पाणी सोडलंय. गुगलची नोकरी सोडून या तरुणाने स्वतःच किचन सुरु केलंय. मुंबईतील या तरुणाचं नाव आहे मुनाफ कपाडिया. 

मुनाफ कपाडिया हा बोहरी समाजाचा. त्यामुळे बोहरी समाजातील जेवणाची चव सर्वांपर्यंत पोहोचावी आणि या जेवणाचा आनंद सर्वांना मिळावा असं त्याला वाटत होतं. यावर विचार करून मुनाफने आईच्या मदतीने स्वतःच किचन सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुनाफच्या ग्राहकांना त्याच्या जेवणाची चव आवडली. या व्यवसायाच्या जोरावर मसुरी, हैद्राबाद आणि नंतर मुंबई आलेल्या मुनाफने आपली गुगलमधील अकाऊंट स्ट्रॅटजिस्टची नोकरी सोडली. 

मोठी बातमी - पाणीपुरी, भेळपुरीच्या गाड्या खुणावतायत ? मसाला डोसे आठवतायत ? थांबा, आधी ही बातमी वाचा

...आणि फोर्ब्स मासिकातून आला फोन :

सुरवातीला मुनाफला हव्या तेवढ्या ऑर्डर्स मिळत नव्हत्या. त्यामुळे त्याने धंदा बंद करण्याचाही विचार केला. मात्र अचानक त्याला फोर्ब्स मासिकातून फोन आला. त्यांनी मुनाफची सक्सेस स्टोरी फोर्ब्समध्ये छापणार असल्याची माहिती दिली. याने मुनाफचा आत्मविश्वास द्विगुणति झाला आणि त्याने स्वतःला या व्यवसायात अधिक मेहनतीने झोकून दिलं

मुनाफच्या किचनमधील थाळी बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्र्यांनी चाखली आहे. यामध्ये अभिनेते ऋषी कपूर, ह्रितिक रोशन आणि राणी मुखर्जी यांचा समावेश आहे. सध्या मुनाफ या व्यवसायातून वर्षाकाठी तब्बल ५० लाख रुपये कमावतोय. 

mumbai boy munaf kapadiya who sold google job and started his own tbk kitchen : 

loading image
go to top