Crime : माथेफिरू तरुणाचा प्रेयसीवर चाकूने वार करत तिच्या मित्रावरही हल्ला; कारण, केवळ वाढदिवसाला...

प्रेयसी फसवत असल्याच्या संशयावरून 30 वर्षीय तरूणाने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार सांताक्रुझ पूर्व येथे घडला.
Knief Attack
Knief AttackSakal
Summary

प्रेयसी फसवत असल्याच्या संशयावरून 30 वर्षीय तरूणाने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार सांताक्रुझ पूर्व येथे घडला.

मुंबई - प्रेयसी फसवत असल्याच्या संशयावरून 30 वर्षीय तरूणाने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार सांताक्रुझ पूर्व येथे घडला. यावेळी आरोपीने तिच्या मित्रावरही हल्ला केला. दोघांनाही व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरूणी ही कार्यक्रम आयोजन क्षेत्रात कार्यरत आहे. तिचा मित्र फराज अन्सारी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती गेली होती. यावेळी अन्सारी आणि तरूणीचा मित्र रिफाकत वडगामा आणि इतर उपस्थित होते. शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अन्सारी याचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्व मंडळी होलीक्रॉस कम्युनिटीजवळ फिरण्यासाठी आले होते.

त्यावेळी मुंब्रा येथे राहणारा प्रियकर समीर शेख तेथे आला. शेखने तरूणीला मारहाण केली, तिचा फोन हिसकावून घेतला आणि वडगामाकडे बोट दाखवत तो कोण आहे, असे विचारले.

तरूणीने त्याला उत्तर देत वडगामा तिचा मित्र असल्याचे सांगितले. यानंतर शेखने तिला शिवीगाळ केली, चाकू काढला आणि तिच्यावर हल्ला केला. वडगामाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शेखनेही त्याच्यावर हल्ला केला. नंतर शेख घटनास्थळावरून पळून गेला, असे तिच्या मैत्रिणीने तक्रारीत म्हटले आहे.

तरूणीची मैत्रिणी आणि तिच्या इतर मित्रांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मैत्रिणीच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी समीर शेखविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. तरूणी दुसऱ्या तरूणाला भेटते, या संशयावरून गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी शेख तिच्याशी भांडत होता, असे तरूणीने सांगितल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com